Home Breaking News शिवरत्न सेने’चे संस्थापक/अध्यक्ष श्री. प्रदीप उमरे यांनी ‘मुंबई’ येथील ‘शिवसेने’चे (उबाठा) महाराष्ट्र...

शिवरत्न सेने’चे संस्थापक/अध्यक्ष श्री. प्रदीप उमरे यांनी ‘मुंबई’ येथील ‘शिवसेने’चे (उबाठा) महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालय ‘शिवालय’ येथे दिली ‘सदिच्छा’ भेट.

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मुंबई  (चंद्रपूर)  :-  श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शुभहस्ते मंगळवार,दि.५ डिसेंबर २०२३ ला, ‘नूतनीकरण’ करून उद्दघाटीत झालेल्या ‘शिवसेने’चे महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालय असलेल्या मंत्रालयासमोरील “शिवालय”:७, शासकीय बराक, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१ येथे, ‘सदिच्छा’ भेट दिली,

महाराष्ट्रातील मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी स्वाभिमान, मराठी संस्कृती, आणि सरतेशेवटी महाराष्ट्राची ‘अस्मिता’ आणि ‘महाराष्ट्र-धर्म’ हा ‘शिवरत्न सेने’चा आणि ‘शिवसेने’चा मुख्य गाभा आहे…!!!

भेटीप्रसंगी, शिवसेनेचे नेते तथा समन्वयक प्रकाशजी वाघ, मा. नगरसेवक/दिडोशी विधानसभा संघटक/चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांतजी कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर/एस. टी. कामगार सेना, विभागीय अध्यक्ष संदीपजी गिऱ्हे, शिवसेना सोशल मीडिया समनव्यक सुजित पेंदोर आणि इतर शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते !!…

‘शिवरत्न सेने’चे संस्थापक/अध्यक्ष प्रदीपजी उमरे, इजि. राहुलजी पिदूरकर, पंकजजी टिपले यांनी नुकतीच ‘शिवालय’ कार्यालयाला दिलेली “सदिच्छा” भेट…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here