Home वरोरा लक्षवेधी :- लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांची ही कसली उत्सवगिरीतून चमकोगिरी ?

लक्षवेधी :- लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांची ही कसली उत्सवगिरीतून चमकोगिरी ?

संस्कृतिक, धार्मिक, क्रीडा व पारंपारिक उत्सवाचे आयोजन करण्यासाठी लोकप्रतिनिधीना निवडून द्यायचे का?

लक्षवेधी :-

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्थरातून येत आहे, कारण सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी राजकारन्यांनी दाखवली आहे. आज ह्या पक्षात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन नेते मंडळी आपले संस्कृतीक धार्मिक व सामाजिक संस्कार विसरले आहे. अशातच लोकप्रतिनिधी यांची जनतेप्रती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांच्याकडून पार पाडली जातं नसल्याने त्यांनी राजकारणात नवा पायंडा घालत धार्मिक संस्कृतीक सामाजिक व क्रीडा उत्सवाचे आयोजन सुरु केले आहे, यात चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व राजकारणी यांनी महारथ मिळवली असल्याचे दिसत आहे.

खरं तर संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन हे एखादी सामाजिक संस्था करायची किंवा एखादे मंडळ करायचे, तर क्रीडा उत्सवाचे आयोजन हे राज्याचा क्रीडा विभाग किंव्हा क्रीडा मंडळ करायचे पण आता हे चित्र बदलले असून त्यावर लोकप्रतिनिधी आणि राजकारणी यांनी कब्जा केला आहे, ज्या लोकप्रतिनिधी यांना जनतेची कामे करण्यासाठी निवडून दिल्या जाते व जनतेचे ज्वलंत आणि जिवंत प्रश्न सोडविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असतें ते सोडून त्याची कामे नसताना लोकप्रतिनिधी हे संस्कृतीक धार्मिक व क्रीडा उत्सव साजरे करण्यात गुंतले असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. आता तर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण राजकीय पक्षाच्या प्रचाराचे माध्यम बनले असून राजकारणी मंडळींनी बायकांचा कार्यक्रम पण हायजाक करून राजकारणाची खालची पातळी ओलांडली आहे, लोकप्रतिनिधी यांनी गावाचा शहराचा विकास कारण्यासोबतच जनतेचे प्रश्न सोडवणे आवश्यक असताना ते सोडून हे धार्मिक सामाजिक व क्रीडा उत्सव साजरे करणार असेल तर यांना जनतेने यासाठी निवडून दिले आहे का? हा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे राजकारण म्हणजे तमाशाचा फळ आहे की काय? असे वाटायला लागते.

वरोरा भद्रावती तालुक्यात हळदी कुंकवाचे राजकीय आयोजन कशासाठी?

राजकारणात काही नेत्यांकडे दूरदृष्टी व ध्येय नाही, त्यामुळे जनतेनी आपल्याला निवडून द्द्यावे यासाठी ते आपली जनतेत छबी निर्माण करण्यासाठी धार्मिक पारंपरिक, संस्कृतीक व क्रीडा उत्सवाचे आयोजन करण्यात व्यस्त आहे, वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात तर राजकीय नेते मंडळी कबड्डी हॉलिबाल यासह क्रिकेट सामन्यांचे आयोजन करून चमकोगिरी तर करताहेत पण आता ते महिलांना समोर करून बायकांचा हळदीकुंकू हा पारंपरिक कार्यक्रम पण हायजाक करत आहे. विशेष म्हणजे या हळदीकुंकू कार्यक्रमातून महिलांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्या जातं आहे.

आज वरोरा भद्रावती तालुक्यात समस्यांचा डोंगर उभा ठाकला असताना व शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अनुत्तरीत असताना ते सोडविण्याचे सोडून राजकीय नेते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली ओळख निर्माण व्हावी व जनतेनी निवडून द्याबे म्हणून फालतूची चमकोगिरी करत असतील तर जनतेनी आता सजग राहायला हवे, आज बेरोजगार तरुणांना रोजगार नाही, शासनाकडून कुठल्याही योजना पूर्णतः राबवल्या जातं नाही, अतिवृष्टी पूरबुडाई ची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही, पीक विम्याचे पैसे मिळाले नाही व कापासाला आणि सोयाबीनला भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा उडवली जातं असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणे व त्यांना आधार देणे आवश्यक आहे मात्र राजकीय पक्षाचे नेते व संभावित उमेदवार केवळ उत्सव व पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करून जनतेला भ्रमित करणार असेल तर अशा राजकीय नेत्यांना आता सुज्ञ जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here