Home चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव प्रभाग च्या वतीने हळदी कुंकू व स्नेह मिलन सोहळा...

राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव प्रभाग च्या वतीने हळदी कुंकू व स्नेह मिलन सोहळा संपन्न…

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून वडगाव प्रभाग क्रमांक आठ दिनू जी भवन वडगाव येथे दिनांक 04/02/2024 हळदी कुंकू व स्नेह मिलन सोहळा कार्यक्रम घेण्यात आला , या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या व वडगाव प्रभागातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभागातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित महिलांचा सत्कार देखील करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड तसेच प्रभागातील सत्कारमूर्ती महिला उपस्थिती होते
या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, प्रमिला बावणे,शालिनी महकुलकर, महिला कार्य अध्यक्ष हिमांगी बिसवास, बबिता बोबडे उपस्थिती होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली त्या नंतर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रभाग अध्यक्ष रेखा जाधव ह्यांनी केले. त्या नंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्या नंतर सत्कारमूर्ती म्हणून सौ.उषाताई बुक्कावार, सौ. वर्षा ताई जामदार व बाल चिकित्सक सो.अश्विनी भारत यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्नेहसंमेलन प्रोग्राम मध्ये वडगाव प्रभागातील असंख्य महिलांनी सहभाग घेतला.

हळदी कुंकू व स्नेह संमेलन कार्यक्रमा मध्ये सत्कारमूर्ती ने आपले मनोगत व्यक्त केले व सत्कार करण्यात आल्या मुळे आयोजकांचे आभार मानले अध्यक्षीय भाषणात राजीव कक्कड ह्यांनी आपले विचार मांडतांना महिला शशक्तिकरण, महिला सुरक्षा, महिलांन करीता शासनाच्या विविध शासकीय योजना, तसेच महिलांना सामाजिक क्षेत्रा विषयी उपयोगी माहिती दिली आणि महिलांनी सुद्धा सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्याचे आव्हान केले.

कार्यक्रमात वडगाव प्रभागातील असंख्य महिलांनी सहभाग घेतला
वडगाव प्रभागातील महिला पदाधिकारी बावणे ताई,जाधव ताई बोबडे ताई व इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना हळद कुंकू लावून वाण वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ……….. ह्यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रमिला बावणे ताई ह्यांनी केले तसेच या कार्यक्रमांमध्ये शालिक भोयर मुळेवार साहेब, रम्प्यारे शर्मा, अप्पाजी बाविस्कर, मनोज सोनी, बिस्वास, केतन जोरदार आधी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी ते साठी मेहनत घेणारे युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे व सर्व युवक व युवती, व महिला पदाधिकारी ह्यांचे कौतुक शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here