Home Breaking News अखेर श्रावणबाळ योजनेसाठी जिल्ह्याला मिळणार ९ कोटी

अखेर श्रावणबाळ योजनेसाठी जिल्ह्याला मिळणार ९ कोटी

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

लवकरच वितरण होणार : सामाजिक न्याय विभागाकडून मंजुरी

चंद्रपूर  :-  दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील वृद्धांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागू नये म्हणून लागू झालेली श्रावणचाळ योजनेचा लाभ निधीअभावी दरमहा मिळत नाही. त्यामुळे सरकारविरुद्ध नाराजी असताना सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून बुधवारी (दि. ७) जिल्ह्यासाठी ९ कोटी ५४ लाख ५६ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचे तातडीने वितरण झाल्यास पात्र लाभार्थ्यांना दिलासा

मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कमी उत्पन्न असलेले हजारो कुटुंबे आहेत. त्यातील बहुतांश हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. अशा बहुसंख्य कुटुंबांकडे जीवनावश्यक व मूलभूत वस्तूंची कमतरता असते. त्यातील बहुसंख्य नागरिक दारिद्रयरेषेखालील जीवन

जगतात. त्यामुळे असे कुटुंब त्यांच्या घरातील वृद्धांकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता असते.वृद्धांकडे त्यांच्या वृद्धापकाळात कोणतीही आर्थिक साधन नसतात. त्यामुळे बहुतेकवेळा कुटुंबाकडून त्यांची उपेक्षा केली जाते. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांचा अपमान केल्या जातो, त्यामुळे अशा ज्येष्ठ नागरिकांना समाजात जीवन जगणे

कठीण होते, त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे व सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासनाने श्रावणबाळ योजना सुरू केली. मात्र, दरमहा अनुदान वितरण होत नसल्याने लाभार्थ्यांना मदतीसाठी वाट पाहावी लागते. दीर्घ प्रतीक्षेनंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने जिल्ह्यासाठी ९ कोटी ५४ लाख ५६ हजारांचा निधी मंजूर केला आहे.

काय आहेत अटी?

ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकामधून अधिकृत जन्मप्रमाणपत्र, वयाचा किया शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद वयाचा उतारा किया ग्रामीण व नागरी रुग्णालयाच्या अधीक्षक व त्यावरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकायाने दिलेला वयाचा दाखला ग्राह्य धरला जातो. दारिद्रयरेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्त्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याचा अधिकृत पुरावा, ग्रामीण भागात ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार किया तहसीलदारांनी रहिवासी दाखला सादर करावा, विलंबामुळे वृद्धांची आर्थिक कोंडी

श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या दोन श्रेणी करण्यात आल्या आहे.

श्रेणी (अ) आणि श्रेणी (ब), या योजने अंतर्गत ६५ व ६५ वर्षांवरील आणि दारिट्चरेषे- खालील कुटुंबांच्या यादीत नाव समाविष्ठ असणाऱ्या निराधार स्त्री व पुरुष नागरिकांना आवणचाळ सेवा निवृत्तिवेतन योजना गट(अ) मधून ४०० रुपये प्रतिमहिना निवृत्तिवेतन दिले जाते.

याच लाभाथ्यांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेचे २०० प्रतिमहिना असे एकूण ६०० प्रतिमहिना प्रतिलाभार्थी निवृत्ति- वेतन देण्याची तरतूद आहे; पण निधी मिळण्यास विलंब होत असल्याने वृद्धांची आर्थिक कोंडी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here