Home Breaking News विज कंत्राटी कामगारांचे सहावा टप्पा 05 मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु…..

विज कंत्राटी कामगारांचे सहावा टप्पा 05 मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु…..

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  महानिर्मिती, महावितरण व महापारेषण कंपनीतील कंत्राटी कामगारांनी ५ मार्च २०२४ पासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरवात. कामगार उपायुक्त संतोष भोसले यांनी तिन्ही कंपनी व वीज कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीची सोमवारी (ता. २६) बांद्रा येथे बैठक घेतली होती.

वीज उद्योगातील सर्व कंत्राटी कामगारांना कंत्राटदारविरहित रोजगार दिल्यास प्रशासकीय खर्चात दर वर्षी सुमारे २ अब्ज ३२ कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत पडू शकतात. यासाठी कंत्राटदारविरहित रोजगार द्यावा, पगारवाढ करावी व वयाच्या ६० वर्षांपर्यंत रोजगार द्यावा, या व अन्य महत्त्वपूर्ण प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात

९ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यात वीजनिर्मिती केंद्र व वितरण व पारेषण ऑफिसवर कामबद्ध आंदोलन सुरू केले होते.

पाचव्या टप्प्यात २८ व २९ फेब्रुवारीला २ दिवस ४८ तास कामबंद आंदोलन कामगारांनी पुकारले होते, ५ मार्चपासून बेमुदत आंदोलन करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यभरात एकूण २७ संघटनेचे कामगार आंदोलनात उतरले आहेत. असे राज्य संघटक सचिन मेंगाळे यांनी सांगितले. कोणत्याही अटी न घालता कामगारांनी आपल्या हितार्थ या आंदोलनात उतरावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते नचिकेत मोरे यांनी केले. या आदोलनात कामगार उपायुक्त भोसले, महावितरणचे ललित गायकवाड, महापारेषणचे भरत पाटील, महानिर्मितीचे पुरुषोत्तम वारजूरकर, तसेच सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थितिथी राहणार आहे.

     काय आहे सहाव्या टप्प्याचे बेमुदत संपाच्या मागण्या

पतसंस्थेत कंत्राटदारांना वेतन करू देणार नाही, सर्व वेतन हे राष्ट्रीयीकृत अथवा शेड्यूल बँकेमध्ये करण्याची नव्याने अट घातली जाईल. या वेतनखात्याच्या माध्यमातून कामगाराला २० लाखांचा विमा देण्याची तरतूद करण्यात येईल, असा प्रस्ताव कंपनीच्या वतीने कामगार आयुक्तांना दिला आहे. मात्र आंदोलनाच्या मुख्य धोरणात्मक मुद्द्यांवर प्रशासनाने आतापर्यंत कोणताही ठोस निर्णय न दिल्याने कृती समिती हे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. राज्यात कंत्राटी कामगारांच्या हितार्थ हरियाना पॅटर्न चालू करावा, अशी अपेक्षा संयुक्त कृती समितीने कामगार उपायुक्त यांच्याकडे व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंटाटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 चंद्रपूर मधील सुद्धा कंत्राटी कामगार अमोल ठाकरे, प्रवीण झाडे, रितेश किंनाके, निखिल एरगुडे, महेश मॅडमवार, आणि इतर कामगारांचा सहभाग नोंदवन्यात आला आहे.

Previous articleIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर
Next articleजनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची उत्कर्ष साठी निवड….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here