Home Breaking News IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर

IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

आयपीएल सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर येथे पाहा वेळापत्रक

आयपीएल  :- IPL Match Time table 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होत आहे.

17 दिवसांच्या कालावधीत एकूण 21 सामने होतील. हे 21 सामने 10 शहरांमध्ये खेळवले जातील.

आयपीएल 2024 मधील पहिला सामना 22 मार्च रोजी रात्री 8 वाजता महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि फाफ डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होईल.

केकेआरचे सर्वात कमी सामने आहेत, दिल्लीत एकही सामने नाही

हा उद्घाटन सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. जाहीर केलेल्या

वेळापत्रकानुसार, क्रिकेट चाहत्यांना या १७ दिवसांत एकूण चार डबल हेडर पाहायला मिळतील.

डबल हेडर म्हणजे एका दिवसात दोन सामने खेळवले जातील. सायंकाळचे सामने 7.30 वाजल्यापासून तर दुपारचे सामने 3.30 वाजल्यापासून खेळवले जातील.

पहिल्या 17 दिवसांमध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) चे संघ जास्तीत जास्त 5-5 सामने खेळतील.

तर चेन्नई सुपर किंग्स (CSK), सनरायझर्स हैदराबाद (SRH), मुंबई इंडियन्स (MI), राजस्थान रॉयल्स (RR), लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांना प्रत्येकी चार सामने खेळायला मिळतील.

तर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) फक्त तीन सामन्यांमध्ये सहभागी होणार आहे.

या शेड्यूलची खास गोष्ट म्हणजे ऋषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स ही संघ विझाग (विशाखापट्टणम) येथे आपला पहिला होम सामना खेळणार आहे.

तर इतर संघांचे घरचे सामने त्यांच्या घरच्या मैदानावर होणार आहेत.

कदाचित लोकसभा निवडणुकीमुळे दिल्लीत लढती नियोजित झाल्या नाहीत.

IPL 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक

1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8.00

2. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वा.

3. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30

4. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता

5. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वा

6. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज, 25 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.

7. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वा.

8. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वा

9. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, संध्याकाळी 7.30 वा.

10. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 29 मार्च, बेंगळुरू संध्याकाळी 7.30

11. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, 30 मार्च, लखनौ संध्याकाळी 7.30 वा.

12. गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, 3.30 PM

13. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता

14. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वा.

15. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल बेंगळुरू संध्याकाळी 7.30

16. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30

17. गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 4 एप्रिल, अहमदाबाद संध्याकाळी 7.30

18. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30

19. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30

20. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता

21. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30

उर्वरित वेळापत्रक कधी जाहीर होणार हे बीसीसीआयने सांगितले

सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे बीसीसीआयने सांगितले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भारतातील आगामी लोकसभा निवडणुकीशी संबंधित सर्व आवश्यक प्रोटोकॉल आणि सूचनांचे पालन करून बीसीसीआय सरकार आणि सुरक्षा यंत्रणांसोबत जवळून काम करेल.

18 व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, बोर्ड 21 सामन्यांच्या वेळापत्रकाशी संबंधित कोणत्याही समस्यांचे पुनरावलोकन करेल आणि निराकरण करेल.

यानंतर, बीसीसीआय मतदानाच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित हंगामाचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करेल.

Previous articleनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा
Next articleविज कंत्राटी कामगारांचे सहावा टप्पा 05 मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here