Home वरोरा क्राईम ब्लास्ट :- एकोना कोळसा खाणीत कोळसा चोरी आली समोर, कंत्राटदार कंपनी...

क्राईम ब्लास्ट :- एकोना कोळसा खाणीत कोळसा चोरी आली समोर, कंत्राटदार कंपनी वांद्यात?

कोट्यावधीची कोळसा चोरी आजवर होतं असल्याची शंका, सीबीआय चौकशीची मागणी, मुख्य आरोपी पकडले जाणार?

क्राईम ब्लास्ट :-

जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर अवैध दारुविक्रीवर अंकुश लागेल्याने आता त्या धंद्यात गुंड बदमाष वेगळ्या अवैध धंद्यात उतरले असल्याचे बोलल्या जातं आहे व कोळसा खाणीतून कोळसा चोरीच्या धंद्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याची माहिती आहे, दरम्यान भद्रावती तालुक्यातील बरांज च्या एमटा (केपीसीएल) मधील 4 लाख टन कोळसा चोरीचे प्रकरण गाजले असतांना व आता सुद्धा या कोळसा खाणीतून कोळसा चोरी होतं असल्याच्या चर्चा होतं असताना वरोरा तालुक्यातील एकोना कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी होतं असल्याची घटना समोर आली आहे, यामध्ये एक ट्रक कोळसा पोलिसांनी पकडला असून त्या ट्रक चा ड्राइवर गाडी सोडून फरार झाला आहे, मात्र वरोरा पोलिसांनी आयपीसी कलम 379 व इतर कालमान्वये गुन्हे दाखल केले असून या कोळसा चोरीचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या रडारवर आहे.दरम्यान या प्रकरणाची सीबीआय चौकशी कारण्यात यावी अशी मागणी होतं आहे.

एकोना कोळसा खाणीतून कोळसा उचल करण्याचे कंत्राट ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीला मिळाले त्या त्यापैकी विकास कोल व चड्डा ट्रान्सपोर्ट कंपन्याचं रेकॉर्ड हे संशयास्पद आहेच, पण स्थानिक एकोना वेकोली चे सबएरिया मॅनेजर यांच्या सोबत साठगाठ करून कोळसा सायडींग वरून ह्या कंपनीतील कर्मचारी सुपरवाईजर बेकायदेशीर कोळसा ट्रक मध्ये भरून तो परस्पर बाहेर पाठवल्या जातोय व दिवसातून किमान पाच ते दहा गाड्या भरल्या जातं असल्याची चर्चा आहे, या कोळसा चोरीत राजकीय वरदस्त असणाऱ्या वरोरा व बाहेरील गुंडाच्या टोळीचा सहभाग असल्याचे बोलल्या जातं असून ते आरोपी आता फरार झाले आहे, ही कोळसा चोरी पूर्व नियोजित पद्धतीने मागील अनेक दिवसापासून सुरु असून त्याला लोकप्रतिनिधी यांचा राजाश्रय असल्याने बिनबोभाटपणे सुरु आहे, दरम्यान आता हे प्रकरण उघडकीस आल्याने खरे सूत्रधार कोण? याबद्दल पोलीस तपासातून समोर येणार आहे.

विकास कोल संचालकावर संशय?

जिल्ह्यात विकास कोल कंपनी ही वेकोली मधील कोळसा वाहतूक करणाऱ्या मोठया कंपन्यापैकी एक असून काही वर्षांपूर्वी यांच्या कोळसा वाहतूकीच्या चोरीचा गाड्या पकडल्या गेल्या होत्या पण या कंपनीचे संचालक व व्यवस्थापक यांनी वेकोली अधिकारी पोलीस स्टेशनं व खनिकर्म अधिकारी यांच्यासोबत आर्थिक देवाघेवाण करून कोळसा चोरीचा व्यवसाय थाटला आहे, दरम्यान एकोना कोळसा खाणीतून जी कोळसा भरून गाडी बाहेर गेली ती विकास कोल यांच्या माध्यमातून भरून देण्यात आल्याची चर्चा आहे. अर्थात या कोळसा चोरीत विकास कोल कंपनीवर संशय व्यक्त होतं आहे.

लेडी सिंघम आयपीएस नियोमी साटम यांच्या भूमिकेवर सर्वांच्या नजरा.

वरोरा येथे एसडिपीओ म्हणून नव्यानेच रुजू झालेल्या आयपीएस नियोमी साटम यांचा अवैध व्यवसायिकावर कारवाई चा बडगा बघून या परिसरातील जनतेने त्यांना लेडी सिंघम म्हणून उपाधी दिली आहे, दरम्यान त्या उपाधीला साजेसे धडक कार्यवाहीचे काम त्या करतात त्यामुळे या परिसरातील अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले आहे, मात्र कोळसा खाणीतून कोळसा चोरी होण्याचा प्रकार त्यांच्या रडारवर नव्हता कारण त्यांच्याकडे अशी कुठली माहिती नव्हती मात्र आता एकोना कोळसा खाणीतून या कोळसा चोरी प्रकरणी तपासाची चक्रे त्यांनी योग्य दिशेने फिरवली तर कोट्यावधी रुपयाच्या कोळसा चोरी प्रकरणात काही गुंड टोळी तर समोर येईलच पण सोबत त्यांचे आलाकमान पण पोलिस तपासात समोर येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे लेडी सिंघम आयपीएस नियोमी साटम यांच्या भूमिकेवर सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here