Home चंद्रपूर प्रस्थापित उमेदवरांच्या तुलनेत वंचित चे राजेश बेले चर्चित, बहुजन समाजाचा वाढताहेत पाठिंबा.

प्रस्थापित उमेदवरांच्या तुलनेत वंचित चे राजेश बेले चर्चित, बहुजन समाजाचा वाढताहेत पाठिंबा.

राजेश बेले यांच्यासाठी लोकवर्गणी होणार असल्याची चर्चा, दुहेरी लढतीत राजेश बेले तिसरा भिडू.

चंद्रपूर :-

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणुक लढविणारे राजेश बेले यांना बहुजन समाजाचा मोठा पाठिंबा मिळत असून त्यांच्यासाठी लोकवर्गणी सुद्धा काढली जाण्याची शक्यता लक्षात आहे, अशातच त्यांनी कांग्रेस भाजप उमेदवरांच्या बरोबरीने बहुजन समाजाच्या पाठिंब्यावर तिसरा भिडू म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. दरम्यान जनतेचा वाढता पाठिंबा बघता माझ्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांतील उमेदवाराच्या पायाखालची वाळु सरकत चाललेली असल्याने तें माझी बदनामी करीत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

वंचित चे नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजनांना आम्ही संसंदेत घेवुन जावु हेच आमच धोरण आहे. आणि ते धोरण या आमच्या सगळ्या वंचित बहुजनांनी स्विकारलेल आहे. प्रस्थापित राजकारण्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याची वेळ आल्याने विविध माध्यमातुन माझी बदनामी करण्यात येईल. मी कोणत्याही आरोप प्रत्यारोपांना न घाबरता प्रस्थापितांच्या विरोधात वंचितांचा झेंडा हातात घेवुन लढणार आहे त्यासाठी बहुजन समाजातील जनतेने आपला स्वभिमानी बाणा दाखवा असे आवाहन राजेश बेले यांनी केले आहे.

प्रस्थापित पक्षांनी या राज्यात भ्रष्टाचाराचे राजकारण केले. ईडीचा धाक दाखवून छोट्या पक्षांना फोडून त्यांना भाजपमध्ये आणण्याचे काम सुरू आहे, इकडे जिल्ह्यात प्रदुषन निर्माण केले आहे. त्याचा बुरखा आम्ही फाडणार आहोत. जगलात कोणते महोत्सव झालेत. बांबु कसे जळलेत व स्टेडीयम बस स्टॅन्ड कसे कोसळलेत, हे जनतेसमोर मांडण्यात येईल असे आव्हान करून चंद्रपूर सह यवतमाळ जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठे जनसमर्थन मिळत असून ओबीसी समाज सुद्धा आता एकत्र झालेला आहे असे राजेश बेले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here