Home चंद्रपूर खळबळजनक :- सामाजिक माध्यमावर एका व्हायरलं स्क्रिप्ट वरून धानोरकर परिवाराच्या रंजक पटकथा...

खळबळजनक :- सामाजिक माध्यमावर एका व्हायरलं स्क्रिप्ट वरून धानोरकर परिवाराच्या रंजक पटकथा समोर.

ऐ मेरे दोस्त लौटके आजा फेम” भोला फिशरभाऊ धामेकर (कट्टर डीके) नावाच्या लेखकाने लिहिली भन्नाट स्टोरी.

चंद्रपूर :-

“ताईला निवडून आणायचं आहे, तुम्हाला भाऊच्या त्यागाची शपथ आहे.” या मथाlळ्याखाली स्क्रिप्ट व्हायरलं करणाऱ्या “ऐ मेरे दोस्त लौटके आजा फेम” भोला फिशरभाऊ धामेकर (कट्टर डीके) नावाच्या लेखकाने जी धानोरकर परिवाराची स्क्रिप्ट लिहिली ती भन्नाट असून त्यात नमूद वस्तुस्थितीच्या बाबीचा उल्लेख अतिशय मार्मिक पद्धतीने करण्यात आला आहे, ही स्क्रिप्ट चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघात मोठया प्रमाणात व्हायरलं होतं असून हेच का धानोरकर परिवाराचं सामाजिक योगदान? हा प्रश्न पडत आहे. स्वार्थासाठी जातं समोर करून आपलं कर्तव्य विसरणाऱ्या धानोरकर परिवाराला कुणबी समाजाच्या लोकांनी काय म्हणून मतदान करायचे हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, कारण ज्या धनुजे कुणबी समाजाच्या भरोशावर आमदार खासदार म्हणून संधी मिळाली त्याचं धनुजे कुणबी समाजाच्या एका भोला फिशरभाऊ धामेकर (कट्टर डीके) नावाच्या लेखकाने आपल्या मनातील खंत व्यक्त करून जातीच्या नावाने मतदान मागणाऱ्या धानोरकर परिवाराची खरी ओळख त्यांनी समोर आणली आहे,


हे पण वाचा

आश्चर्यजनक :- आमदार प्रतिभा धानोरकर यांची संपत्ती साडेचार वर्षात 40 पटीने वाढली.


 

काय आहे ती स्क्रिप्ट?

“ताईला निवडून आणायचं आहे, तुम्हाला भाऊच्या त्यागाची शपथ आहे.”

दिवंगत भाऊ खासदार होते, आपल्या सर्वांचे लाडके होते. भाऊंच्या जाण्याने देशाची झाली खूप मोठी हानी. पोरक झालं लोकसभा क्षेत्र आणि शांत झाली वाघाची डरकाळी. भाऊ ला कुठलेही व्यसन नव्हते, देशाचे ते शहीद होते. ताई आमदार आहेत. मोठे भाऊ माजी नगराध्यक्ष आहेत. सर्व जमेची बाजू आहे. म्हणून ताई खासदार झाल्याच पाहिजे. सर्व कार्यकर्ते व समाज बांधव मिळून कामाला लागू. तन-मन-धन लावून दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून मेहनत घेवू, पण ताईला नक्कीच निवडून आणू.
घनओकर कुटुंबाचं परिसरात योगदान लय भारी, हे विसरून काही चालणार नाही. कुणबी समाजात तर यांचं खूप मोठं काम, त्यामुळेच संपूर्ण कुणबी समाज यांचा फॅन. कुणबी समाजात यांनी तयार केले अनेक नेतृत्व. कुणबी समाजातील अनेक युवकांना दिला रोजगार. कुणबी समाजातील अनेकांचा केला उद्धार. कुणबी समाजातील अनेकांना व्यवसायात मदत फार. कुणबी बेरोजगारांना ठेकेदारीत मोठे करण्यासाठी कमिशन न घेता दिली संधी. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक शहरात बांधले समाजभवण कुणबी. भद्रावती, वरोरा, चंद्रपूर, वणी, आर्णी, सर्वत्र उभारले समाजभवण यांनी. गाव तिथे भवण ही संकल्पना यांची. गावोगावी तयार केले अनेक नेतृत्व. त्यामुळे नेतृत्वाची उणीव भाऊ गेल्यानंतर देखील नाही जाणवली. म्हणून विकासावर मतदान करायचं नाय, जात पाहून मतदान करायचं हाय, ताईला निवडून आणायचं हाय.
यांच्या संघर्षाच्या काळातील लोकं आता कुठे आहेत हे विचारायचं नाही, युझ अँड थ्रो हा यांचा फॉर्म्युला भारी, बसंत आणखी अधिक फुलला पाहिजे. तलावात आणखी मगरी वाढल्या पाहिजे. चिंचोके गोळा झाले पाहिजे, मुडावरचे झाड बहरायला पाहिजे, खान, अजान, मनाज, फणाज, अजगर, वाढले पाहिजे. ओयो शुभ चीनुरफर, क्लासिफ सरकार संस्कृती वाढलीच पाहिजे, हिंदी भाषिक पणपले पाहिजे. अल्पसंख्यांकांना घेवून चालले तरी बेहत्तर, जोसीबुवा जोमात, यांच्या पीए नी कामासाठी पैसे मागितले तरी चालेल, समाजातील स्त्रियांना अश्लील मेसेज पाठवले तरी चालेल, कोरोणा काळात आम्ही का बेड मिळवून देण्यासाठी निवडून आलो का असे म्हटले तरी चालेल, कोरोणा प्रादुर्भाव आहे भेटायला येवू नये, अशी सूचना दाराला लावून ठेवली तरी चालेल, पैशासमोर सर्व झुकतात हे आपले ब्रीदवाक्य ठेवू, खाजवायच नाही, खाज मिटवून देवू, धामे होतील, अशा उघड धमक्या दिल्या तरी चालेल, पांडुरंगांच नाव घ्यायचं, घाबरायच नाही, भीसी आडून राजकारण सुरू ठेवायचं, दलालांना सन्मान द्यायचा, पत्रकारांना मारलं तरी चालेल, रोकमत खिरटवर गुलाम बनला तरी चालेल, अज्ञात गुंडे पाठवून कुणाला झोडपलं तरी चालेल, शूटर पाठवून अध्यक्षावर गोळ्या हाणल्या तरी चालेल, सोसायट्याच्या निवडणुकीत फायली चोरल्या तरी चालेल, निवडणूक अधिकाऱ्याला मारलं तरी चालेल, निवडणुकीत पैसा वाटून मत गोळा केली तरी चालेल, बाऊन्सर आणून चंद्रपूरचा बिहार केला तरी चालेल, वाघाला सर्व काही शोभते अस समजू, ठेकेदारांचे राज्य आपल्याला आणायचे आहे. १०% वरून २०% आणि २०% वरून ४०% कमिशन देवू, तरीही चालेल. १७ दुकांनाची ७० दुकाने झालीच पाहिजे. करेक्ट गेम करण्यासाठी १७ वा मिनिट लागू द्यायचा नाही. पण परमेश्वराचाच परफेक्ट गेम असतो आणि तो परफेक्ट गेम झाला, हे विसरून जायचं, प्रत्येक निवडणुकीत विजय पताका मिळालीच पाहिजे. काकड आरती तयार आहेच. वावरात नाला नसला तरी घरात साला पाहिजेच. दीवा विझला तरी चालेल पण.. पण.. ताई निवडून आलीच पाहिजे.
परवीन काकड आरतीत तर पैसे टाकावेच लागतात, दान धर्म केल्या शिवाय का देव पावतात, आणले का ५०, आणले का २०, आणले का १० अशी काकड आरती विचारत राहते, आणि आपण परवीनची इच्छा पूर्ण करत राहायचं, काकड आरतीत पैसे टाकत राहायचं, कंगाल झालो तरी चालेल पण काकड आरतीच ताट भरत राहायचं, ताईला निवडून आणायचच, हा प्रण प्रत्येक पाच वर्षांनी घेत राहायचा.
आमची माती आमच घनओकर, माझं घर माझं वावर, माझं घर माझा उमेदवार, माझं राजकारण माझंच नेतृत्व व मीच पदाधिकारी, यांचं नेहमी मी-मी च गाणं, म्हणून आम्ही समाजबांधव व कार्यकर्ते साले सतरंज्याच उचलू, यांच्या इमल्यावर इमले चढवू, यांचे बँक बॅलन्स वाढवू, स्वतःच एक घर बांधायला आयुष्य निघून जाते पण यांची प्रत्येक शहरात घरे बांधू, आमचे पोरं बेरोजगार राहिले तरी यांच्या पोरांना महागड्या वस्तू व गाड्या कमी नये पडू, मात्र ताई निवडून आल्याच पाहिजे. क्षितिजावरील सूरज गावडचा कधीही अस्त होवू नये. मतदार क्षेत्रातील समस्या जैसे थे राहिल्या तरी हरकत नाही पण घनओकर कुटुंबाचे राजकारण संपू नये.
नगराध्यक्ष घरचा, आमदार घरचा, खासदार घरचा, यवतमाळ जिल्हा बँकेच्या नोकर भरतीत डोनेशन खाल्ले तरी चालेल, चंद्रपूर जिल्हा बँकेवर पण करडी नजर ठेवली तरी चालेल, इडा पिडा दूर ठेवू, सर्व महत्त्वाची पदे यांच्या घरी देवू, यांच्यासाठीच राबू, आपलं अख्खं आयुष्य खर्ची घालू, पण निवडून ताईला आणू.
सो कॉल्ड बुद्धिजीवी बनू, विचार मंच चालवू, तार्किक विचार बुध्दी बाजूला सारू, फक्त निवडणूक काळात जात जात करू, सोशल मीडियावर जातीसाठी मातीचे मेसेज टाकू, मग पाच वर्षे जाब सुद्धा नाही विचारू, आपलेच ओठ आपलेच दात समजू, त्यांना आपल्या कष्टातून उभे झालेल्या चळवळी, आंदोलन, मोर्चे हायजैक करू देवू, जनगणना, ओबीसी मागण्या साठी सभागृहात बोलले नाही तरी समजून घेवू, मतदार क्षेत्रातील समस्या कमी आणि बाहेरच्या विषयावर सभागृहात अधिक प्रश्न विचारले तरी काही म्हणणे नाही, पण निवडून ताईलाच आणु.
दावणीच ढोर दावणीला येईल असे समजून समाजाला कितीही गृहीत धरलं तरी चालेल, समाजातील ज्येष्ठ नागरिकांसोबत उद्धट बोलले तरी चालेल, यांच्या कार्यालयात गेल्यावर छोटी छोटी कामे नाही झाली तरी चालेल, समाजाची पोरं बेरोजगार राहिली तरी चालेल, भर कार्यक्रमात समाजाच्या भरोषावर आलो काय म्हटले तरी चालेल, समाजाने आमच्या राजकारणात हस्तक्षेप करू नये, असे म्हटले तरी चालेल, हाती चलता है, कुत्ते भोकते है म्हटल तरी चालेल, यांना बारा खून माफ समजू, जीवाच्या आकांताने ओरडू पण आपली धकू निवडून आलीच पाहिजे, असा प्रण घेवू.
कुणी घराणेशाही म्हणायचं नाही, कुणी नाव बोट ठेवायच नाही, यांच्या कारकिर्दीत क्षेत्रात एखादे तरी मोठे काम यांनी केले का? क्षेत्रात एखादा उद्योग आणला का? परिसरातील बेरोजगारासाठी रोजगार उभा केला का? कसीबसी चंद्रपूर जिल्हा बँकेत भरती होवून आपलेच शिक्षित पोरं नोकरीला लागले असते, पण तिथेही आरोप करून नोकर भरती का थांबवली? शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था केली का? बाजार समितीला जागा मिळवून दिली का? क्रीडा संकुल चा विकास झाला का? पांदन रस्त्याच्या कामात किती घोटाळे झाले? विकास कामांचा दर्जा सुमार का? उद्योगात केलेले आंदोलन अर्थपूर्ण होते का? उद्योगातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवले का? स्थानिकांना उद्योगात रोजगार मिळाला का? लोकसभेत निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी विमा काढणार होते, तो काढला का? खासदार दत्तक गाव वायगाव चा विकास झाला का? अवैध व्यवसाय बंद झाले का? पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, वणी येथे कोणती विकास कामे केली? खासदार निधी संपूर्ण लोकसभा क्षेत्रात समसमान वाटला का, की फक्त वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातच वाटला? आमटे प्रकरणाचं काय झालं? यापैकी कोणतेच प्रश्न विचारायचे नाही, आणि फक्त आणि फक्त जात बघायची, जातीसाठी माती खायची, कसाही असला तरी चालेल पण आपला उमेदवार आहे, पुढच्या पिढ्या बरबाद झाल्या तरी चालेल, नवीन नेतृत्व तयार नाही केले तरी चालेल, अल्पसंख्यांक आणि हिंदी भाषिक आपल्या येणाऱ्या पिढीच्या उरावर बसले तरी चालेल, कारण यांच्या राज्यात पैसे फक्त तेच कमवीत आहे व पुढच्या काळात ज्याच्याकडे पैसा तो शेर असेल, पण हे सर्व तूर्तास विसरून जायचं व निवडून फक्त ताईला आणायचं, तुम्हाला दिवंगत भाऊ ची शपथ आहे….

आपलाच,
ऐ मेरे दोस्त लौटके आजा फेम भोला फिशरभाऊ धामेकर (कट्टर डीके)

वरील स्क्रिप्ट चा भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल शी काहीएक संबंध नाही हे वाचकांनी लक्षात ठेवावे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here