Home चंद्रपूर आश्चर्यजनक :- आमदार प्रतिभा धानोरकर यांची संपत्ती साडेचार वर्षात 40 पटीने वाढली.

आश्चर्यजनक :- आमदार प्रतिभा धानोरकर यांची संपत्ती साडेचार वर्षात 40 पटीने वाढली.

धानोरकर यांच्याकडे तब्बल 1 अब्ज 35 कोटी 20 लाख 88 हजार 982 किमतीची मालमत्ता तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे 15 कोटी 48 लाख 7 हजार 405 रुपयांची मालमत्ता.

इकडे सर्वसामान्य माणूस महागाईने त्रस्त, शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली आत्महत्त्या कारण्याच्या मार्गांवर? आणि इकडे पटीने मालमत्ता?

चंद्रपुर : –

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी होतं असलेल्या निवडणुकीत मागील बुधवारीच नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाली. यात 36 उमेदवारांनी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची माहिती शपथपत्रात विशद करीत 48 अर्ज दाखल केले होते. त्यात महाविकास आघाडी (काँग्रेस) च्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्याजवळ 1,35,20,88,982 (1 अब्ज 35 कोटी 20 लाख 88 हजार 982 किमतीची मालमत्ता आहे तर महायुती (भाजपा) चे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे 15 कोटी 48 लाख 7 हजार 405 रुपयांची मालमत्ता आहे. मागील 35 वर्ष राजकारणात असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्यापेक्षा जवळपास 7 तें 8 पटीने संपत्ती केवळ साडेचार वर्षचं आमदार असलेल्या प्रतिभा धानोरकर यांच्याकडे असल्याचे विवरण ऐकून कुणालाही आश्चर्यच वाटेल की एवढ्या कमी काळात एवढी गडगंज संपत्ती आली कुठून? दरम्यान ही माहिती निवडणूक आयोगाने सार्वजनिक केली असून आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संपत्तीच्या मामल्यात मागे टाकले असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

चंद्रपुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी नामांकन पत्रासोबत शपथपत्र देते वेळी आपल्या संमतीचा ब्यौरा दिला आहे. त्यात त्यांनी वर्ष 2019 च्या निवडणुकीत जे शपथपत्र दिले होते, त्यातील दिलेल्या संमतीच्या विवरणाचा तपशील बघितला तर त्यांची साडेचार वर्षात तब्बल 40 पटीने संमतीत वाढ झाल्याची आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे, एकीकडे सर्वासामान्य गोरगरीब जनता यांचं वाढलेल्या महागाईमुळे कंबरडं मोडलं असतांना व शेतकरी यांच्या सततच्या नापिकी व शेतमालाचे भाव घसरल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असतांना त्यांच्या मतांच्या भरोशावर आमदारांची मालमत्ता 40 पटीने वाढते याचे आश्चर्य नाही तर ही जनतेच्या पैशाची लूट असल्याचा गंभीर प्रकार आहे, हे जनतेनी समजून घ्यायला हवं, देशहीत समाजहीत बाजूला सारून स्वहीत साधनाऱ्या लोकप्रतिनिधी यांनी विधिमंडळात जी शपथ घेतली त्या शपथचे  पालन तरी केलंय का? याचा पण विचार करायला हवा. “मी भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचे समर्थन करीन आणि मी ज्या कर्तव्यात प्रवेश करणार आहे ते मी निष्ठेने पार पाडीन, असा कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर खरा विश्वास आणि निष्ठा आहे.” अशा प्रकारची शपथ विधिमंडळात सर्वच आमदार घेतात पण प्रत्यक्षात मात्र याचे उल्लंघन तें करत असल्याने यांच्यावर ईडी व सीबीआय का धाड मारत नाही हा प्रश्न उपस्थित होतं आहे.

काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संपत्तीचे स्रोत काय?

सन 2014 मध्ये जेंव्हा आमदार म्हणून स्वर्गीय बाळू धानोरकर निवडून आले होते तेंव्हा त्यांनी निवडणूक लढण्यासाठी अनेकांकडून कर्ज घेतल्याचे बोलल्या जातं होते, नव्हे त्यांनी ही बाब सार्वजनिकरित्या मान्य पण केली होती, मात्र आमदार निवडून आल्यानंतर केवळ पाच वर्षात त्यांनी खासदार म्हणून निवडणूक लढवली, त्या निवडणुकीत किमान 20 तें 25 कोटी खर्च अपेक्षित होता, तो कुठून केला हा प्रश्न होता, मात्र त्यानंतर खासदार आणि आमदार एकाच घरी असतांना दोघांच्या संपत्तीत 40 पेक्षा जास्त पटीने वाढ ती सुद्धा केवळ साडेचार वर्षात? विशेष म्हणजे ही वाढ शेती व व्यवसायातून 40 पट्टीने झाली, आता तो व्यवसाय कुठला असेल आणि ती शेती नेमकी कशाची असेल याचे आश्चर्य जनतेला वाटायला लागले आहे, जर एखादा आमदार 40 पटीने संपत्ती वाढवतो तर मग त्यांच्या माध्यमातून समाजसेवा सुद्धा तेवढीच झाली असावी असा अंदाज येतो.मात्र ही शेती आणि हा व्यवसाय शेतकऱ्यांना समजून सांगितला तर शेतकऱ्यांचं पण भलं होईल अशी जनतेची अपेक्षा आहे.

काय आहे चल अचल संपत्ती?

आमदार धानोरकर आणि परिवाराकडे 3 फॉर्च्यूनर, मर्सिडीज बेंझ, ऑडी, किया सेल्टोस, होंडा बीआरव्ही आणि 3 दुचाकींचा समावेश आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 49.85 लाख आहे.. अशी माहिती धानोरकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यांचे दिवंगत पती सुरेश धानोरकर यांचे वार्षिक उत्पन्न 72.29 लाख रुपये होते. त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत शेती आणि व्यवसाय आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 25.15 लाख रुपये रोख रक्कम आहे, तर त्यांच्या कुटुंबीयांकडे 50 हजार रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्या सर्व बैंक शाखांमध्ये ठेवी आहेत. त्यांच्या नावावर 272 ग्रॅम सोने असून त्यांच्या कुटुंबीयांकडे अनुक्रमे 180 आणि 205 ग्रॅम सोने आहे. त्याची एकूण किमत 57.60 लाख रुपये आहे. धानोरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे जिल्ह्यात 28 ठिकाणी शेती आहे. तर 26 ठिकाणी बिगरशेती जमीन आहे. यांच्यावर 55.23 कोटींचे कर्ज आहे.

जनतेला काय मिळाले?

मागील साडेनऊ वर्षात धानोरकर कुटुंब वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात सत्तेत आहे आणि त्यांच्याकडे पॉवर आहे, परंतु  त्यांच्याकडून लोककल्याण किती झाले, याचा लेखाजोखा समोर मांडणे महत्वाचे आहे, कारण एखादा लोकप्रतिनिधी जनतेच्या मतातून निवडून येतो त्या जनतेला नेमकं काय मिळालं? हेही तेवढंच महत्वाचं आहे. पण वास्तविकता अशी आहे की या परिसरातील सर्व कंपन्यात त्यांच्या लोकांच्या ठेकेदारी आहे, या परिसरातील कंपन्यात बाहेरील कामगार कर्मचारी आहे, पण त्या विषयाकडे कुणी बघितले तर त्यांचा बंदोबस्त केल्या जातो, “सर्व सत्ता आपल्या हाती बाकी गेले उडत” अशी परिस्थिती इथे आहे, जनतेचे प्रश्न फक्त कागदोपत्री आहे, प्रत्यक्षात कुणाला न्याय मिळाला असेल असा क्वचितच सापडेल, समस्या घेऊन आमदारांच्या घरी जाणे किंव्हा त्या समस्या सोडवल्या जाईल याचा ग्राफ फार कमी आहे, या सर्व बाबीवर गांभीर्याने विचार केला तर जनतेच्या हाती निराशाचं आली आहे, पण 40 पटीनं वाढलेली आमदाराची संपत्ती ही जनतेच्या आशीर्वादाने वाढलेली आहे, ज्यांनी त्यांना निवडून दिलं, पण ती जनताच उघडी पडली असतांना त्यांना आधार देण्याचं काम आमदार खासदार यांच्याकडून झालं नाही, हेच या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जनतेच दुर्भाग्य आहे याची खंत प्रत्येकाला वाटतं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here