Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा कॉग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या काँग्रेसला रामराम करीत भाजपात...

चंद्रपूर जिल्हा कॉग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या काँग्रेसला रामराम करीत भाजपात प्रवेश

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  पूर्व विदर्भात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्हा कॉग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये हुकुमशाही, परिवारवाद आणि दिशाहिन प्रदेश नेतृत्त्व असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

प्रकाश देवतळे यांच्या काँग्रेसला रामराम करीत भाजपात प्रवेश 

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेंचा काँग्रेसला रामराम करण्याचे काय होते कारण

प्रकाश देवतळे म्हणाले, बहुसंख्य असलेल्या तेली समाजाला काँग्रेसने विदर्भात एकही उमेदवारी दिलेली नाही. तेली समाज काँग्रेसच्या नेहमी पाठिशी उभा राहिला आहे. पण त्याची प्रदेश अध्यक्षांनी दखल घेतली नाही. त्यामुळे नाराजीतून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रकाश देवतळे यांनी सुधीर मुनगंटीवार व बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here