Home चंद्रपूर वडेट्टीवार समर्थक माजी कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या भाजप प्रवेशाने कांग्रेसला झटका.

वडेट्टीवार समर्थक माजी कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या भाजप प्रवेशाने कांग्रेसला झटका.

कांग्रेस मध्ये घराणेशाहीला उमेदवारी मिळत असल्याने कंटाळून कांग्रेसला सोडून धरली कमळाची साथ,

चंद्रपूर :-

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात मागील वेळी बबन बांगडे या तेली समाजातील माजी कांग्रेस जिल्हाध्यक्ष यांना उमेदवारी दिली होती, पण नंतर ऐनवेळी बाळू धानोरकर यांना कांग्रेसने उमेदवारी देऊन तेली समाजाचा अपमान केला होता, दरम्यान यावेळी बाळू धानोरकर यांचे निधन झाल्याने व त्यांच्या पत्नी विद्यमान आमदार असतांना सुद्धा नवीन चेहरा कांग्रेस मिळणार त्यातच ही उमेदवारी तेली समाजातील व्यक्तींना मिळेल अशी अपेक्षा होती पण पक्षासाठी कुठलेही योगदान नसणाऱ्या व सत्तेसाठी पुढे पुढे करणाऱ्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना पक्षाने उमेदवारी देऊन तेली समाजावर अन्याय केला आहे, त्यामुळे पक्षाच्या या घराणेशाहीला कंटाळून कांग्रेस जिल्हा कमेटीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी कांग्रेसचा हात सोडून भाजपच्या कमाळाला साथ देण्याचे ठरवले व भाजप आमदार किर्तीकुमार भांगाडिया व भाजप चे चंद्रपूर लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.

जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष असणारे प्रकाश देवतळे हे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे उपाध्यक्ष आहे त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन लोकसभा निवडणुकीत राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक देवतळे यांच्या या निर्णयाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अगोदरच कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी कांग्रेसच्या नेत्यांनीचं माझ्या पतीचा जीव घेतला असा आरोप करून पक्षात अंतर्गत वैरत्व सुरु केले, त्यामुळे कांग्रेस चा एक मोठा गट निवडणूक प्रचारापासून अलिप्त दिसत आहे अशातच पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष पक्ष सोडून जातं असल्याने निवडणूक प्रचाराला खिळ बसली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here