Home Breaking News ताईची मोहमाया, पण भाऊच्या कामाची व्हाह व्हा.

ताईची मोहमाया, पण भाऊच्या कामाची व्हाह व्हा.

विचार मतदारांचे,

येणाऱ्या मतदानाच्या दिवशी ताईची माया काम करेल की भाऊचा विकास काम करेल?

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :- चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार व प्रतिभाताई धानोरकर यांच्यातील उमेदवारी अर्ज भरतांनी झालेल्या शक्ती प्रदर्शनात आमदार प्रतिभा धानोरकरांची सध्या जोरात चर्चा असून चंद्रपूर शहरात निघालेल्या रॅली आणि सभेला अलोट गर्दी उसळली होती.

रखरखत्या उन्हाची पर्वा न करता प्रतिभाताई यांना समर्थन देण्यासाठी लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून जनता आली होती, त्याचे कारणही तसेच होते, आदल्या दिवशी नामांकन फार्म भरून झाल्याने केवळ गर्दी दाखवून भाजप उमेदवार यांच्यावर भारी पडण्याचे उद्दिष्ट होते आणि गावागावात गाड्या पाठवून लोकांना रैली आणि सभास्थळी आणल्या गेले, त्यामुळे गावाखेड्यातील लोकांची गर्दी दखल घेण्यासारखी होती.

असं म्हटल्या जातं की “राजकारणात दिखता है वही बिकता है.” ज्यांनी गर्दी दाखवली त्याची हवा झाली पण ती गर्दी खरंच दर्दी होती का? हा सुद्धा प्रश्नच आहे, कारण जो पैसा फेकेल त्याचा बोलबाला होईल आणि कांग्रेस उमेदवारानी हे नेमकं घेरलं आणि गर्दी करून मैदान मारलं एवढं मात्र खरं.

कांग्रेस उमेदवाराच्या रॅलीची सगळीकडे चर्चा जोरात दिसून आली होती, कारण नामांकन अर्ज भरताना भाऊच्या रॅली मध्ये जितकी गर्दी चंद्रपूकरांना दिसली नव्हती त्याच्या दुप्पट ताईच्या नामांकन अर्ज भरतांना चंद्रपूकरातील नागरिकांना दिसली, परंतु जेव्हा या नागरिकांना विचारांना केली असता भाऊच्या कामाची प्रसंशा आणि कौतुक ऐकायला मिळाले त्यामुळे जमा करण्यात आलेली gardi ही पैसे देऊन आणलेली होती हे स्पष्ट झाले.

दरम्यान या रॅलीच्या गर्दीतील असंख्य लोकांचे विचार मात्र समजले नाही, खरं तर ताईची मोहमाया पण भाऊच्या कामाची व्हाह-व्हा असे चित्र सध्या चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघामध्ये बघायला मिळत आहे, आणि नागरिक ही भाऊच्या कामाची वाह वा का करणार नाही? कारण भाऊ खरंच विकासाच्या कामांमध्ये विकास पुरुष आहे,

भाऊने इतका मोठं मोठा निधी व छोट्या रोडापासून तर मोठमोठी कामे भाऊच्या कारकीर्दीत झाली म्हणूनच तर चंद्रपुरातील नागरिक भाऊच्या कामांची व्हाह व्हावं करत आहे, पण वरवर कांग्रेस हवा करतेय पण भाऊंची जणसामान्यात मोठा आदर आहे, त्यामुळे ताईची माया काम करेल की भाऊचा विकास काम करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here