Home चंद्रपूर लक्षवेधक :- भाजपला हरविण्याची जबाबदारी फक्त वंचित बहुजन आघाडीचीच का?

लक्षवेधक :- भाजपला हरविण्याची जबाबदारी फक्त वंचित बहुजन आघाडीचीच का?

कांग्रेसला मतदान करून अँड बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय ताकत कमी करू नका, वंचितचे राजेश बेले यांना मतदान करा, वंचित नेत्यांचे आवाहन.

चंद्रपूर :-

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत आघाडी करून भाजपला हरविण्याचा प्लान आखला होता व त्यांनी जाहिरपणे त्याबद्दल महाविकास आघाडीतील कांग्रेस शिवसेना राष्ट्रवादी या पक्षाच्या नेत्यांना एकजूट करून त्यावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न पण केला होता, परंतु राजकीय हव्यासापोटी कांग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी अँड प्रकाश आंबेडकर यांना फारस महत्व दिलं नाही, पर्यायाने केवळ 6 ठिकाणी मागितलेली उमेदवारी सुद्धा कांग्रेस शिवसेनेने दिली नसल्याने वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात स्वतंत्र निवडणूक लढेल असे जाहीर करून अँड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वत्र आपले उमेदवार उभे केले, त्यातच चंद्रपूर लोकसभेसाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राजेश बेले या तेली समाजाच्या उमेदवाराला मैदानात उतरविले, चंद्रपूर लोकसभा निवडणूक दुहेरी लढतीत असतांना आता ती तिरंगी झाली खरी, पण वंचित चे काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे यावेळी आपण मोदीला हरविण्यासाठी कांग्रेसलाचं मतदान करणार असा अपप्रचार करीत आहे, दरम्यान दुसरा गट हा आपल्या भूमिकेवर ठाम असून शेवटच्या क्षणापर्यंत लढून आपली सर्वोच्य उपस्थिती दाखवून प्रसंगी उमेदवार कसा विजयी करता येईल याची रनणिती आखत आहे, त्यांचे म्हणणे आहे की आपण देशाचा विचार करतो पण मोदीला हरविण्याची जबाबदारी ही केवळ वंचित बहुजन आघाडीची आहे का? ती जबाबदारी आपण घ्यायची आणि मतदान कांग्रेसला द्यायचं मग आपले नेते प्रकाश आंबेडकर यांचा विचार कोण करणार? अँड प्रकाश आंबेडकर यांनी दलित शोषित पिडीत बहुजन समाजाला एकत्र करून जी राजकीय वाटचाल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चालवलेली आहे, यावरच आपण घाला घालणार आहो का? याचा विचार करावा व कांग्रेस जिंकेल की हरेल हा त्यांचा प्रश्न आहे, पण कांग्रेसला मतदान करून अँड बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय ताकत कमी करू नका, आपला नेता आपलं भविष्य आहे तें भविष्य ओळखा आणि आपला उमेदवार राजेश बेले यांनाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन वंचित च्या नेत्यांनी केले आहे.

महाराष्ट्रत दलित समाजाला कांग्रेस ने गृहीत धरले आहे की हे लोकं जाणार कुठे? यांना शेवटी आमच्याकडेच यावं लागेल, याकरिता कांग्रेस नी वेळीवेळी दलित नेत्यामध्ये फूट पाडून आपली राजकीय पोळी शेकली आहे, पण मागील 2019 च्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत लाखांच्या वर मते घेऊन कांग्रेस चे अनेक उमेदवार पाडले ही वस्तुस्थिती आहे, यावेळी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या दडपशाही धोरणामुळे त्यांना हरवणे आवश्यक आहे, नाहीतर तें देशाचे संविधान बदलून टाकेल अशी परिस्थिती दिसत असल्याने अँड प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण कांग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना योग्य सन्मान दिला नाही, पर्यायाने शेवटी एकटा लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्यातही राज्यात किमान 7 ठिकाणी आपण कांग्रेस उमेदवाराला मदत करू अशी घोषणा केल्यानंतर विदर्भातील नागपूर लोकसभेचे उमेदवार विकास ठाकरे यांना त्यांनी बिनाशर्त पाठिंबा देऊन कांग्रेस ला दिलेलं आश्वासन पाळलं, पण चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले असल्याने त्यांना संपूर्ण वंचित बहुजन आघाडी आणि अँड प्रकाश आंबेडकर यांना मानणाऱ्या सर्वांनी मतदान करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी च्या शीर्श नेत्यांनी केले आहे.

काय आहे बहुजन चळवळ?

महाराष्ट्रात दलित आणि ओबीसींसह सामाजिकदृष्ट्या उपेक्षित असणाऱ्या समूहाची मोठी लोकसंख्या आहे. पण तरीही त्यांचं राजकीय सत्तेतील प्रतिनिधित्व मात्र कायम काठावरचंच राहिलंय. त्यामुळे त्यांना राजकीय सत्तेत बरोबरीची भागीदारी मिळावी म्हणून 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ने दलित, गरीब शेतकरी आणि आदिवासी यांना एका नव्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्यांना केवळ काही मोजक्या मतदारसंघांमध्येच प्रभाव दाखवता आला.त्यानंतर आरपीआयमध्ये काही क्षुल्लक वैचारिक मुद्द्यांरून गटबाजी पाहायला मिळाली. यातून अनेकजण नाराज झाले, असंतुष्ट बनले आणि त्यांना आपल्याकडे खेचण्यात काँग्रेसला यश मिळू लागलं. पुढं आरपीआयमधील अनेक नेत्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी नवीन राजकीय पक्षांची स्थापना केली. त्याचा परिणाम म्हणजे आरपीआय पक्षात आणखी फूट पडत गेली.

1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत आरपीआयचं 14 वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजन झालं. त्यावर प्रामुख्यानं महार जातीच्या नेतृत्त्वाचा प्रभाव होता. त्यानंतरही सत्तेच्या वर्तुळात राहण्याची संधी मिळावी म्हणून आरपीआयच्या या गटांनी काँग्रेससोबत वेळेनुसार आघाडी केली. अखेर या गटांना महाराष्ट्राच्या राजकारणात नगण्य महत्त्वं शिल्लक राहिलं. त्यानंतर 1970 च्या दशकात लोकप्रिय दलित पँथर्सच्या आंदोलनाचा उदय झाला. त्याद्वारे सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रांमध्ये हस्तक्षेपासाठी दलितांचा आवाज बुलंद झाला. पँथर्सनं दलित तरुणांमध्ये नवी भाषा, राजकीय वक्तृत्व आणि संघर्षाची बीजं पेरली. त्यामुळं त्यांना मरणासन्न अवस्थेत पोहोचवणाऱ्या आळसाचं रुपांतच उत्साहात केलं. यासाठी त्यांनी ब्लॅक पँथर्स, कट्टर डावे आणि अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीची वैचारिक मूल्ये घेतली आणि त्याचं ठोस अंबेडकरवादी वैचारिक पर्यायात रुपांतर केलं. त्यातही नेतृत्वातील वैचारिक संघर्ष आणि प्रभावी आंदोलन उभारण्यासाठीच्या साधनांचा अभाव यामुळे ही सामाजिक चळवळही लयास गेली.

त्यानंतरच्या काळात बहुजन समाज पार्टीनंही दलित-बहुजन समाजाचं चांगलं नेतृत्व केल्याचं पाहायला मिळालं. पण त्यांनाही प्रभाव टिकवण्यात फारसं यश आलं नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्वतंत्र अस्तित्व असलेल्या दलित-बहुजनांसाठी नवीन राजकीय पर्याय म्हणून समोर येताना दिसत आहे. राजकीय सत्ता किंवा शक्ती मिळवण्यासाठी ते वंचित गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दलितांची राजकीय चेतना कायम असल्यास त्यांना राजकारणात पुन्हा सामाजिक न्यायाला स्थान मिळवून देण्यात नक्कीच यश मिळू शकतं, हे वंचित बहुजन आघाडीचा निवडणुकीच्या राजकारणातील प्रवेशावरून स्पष्ट होतं. त्यातूनच ते पारंपरिक सत्ताधारी अभिजात वर्गासमोर आव्हान निर्माण करू शकतात. गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांच्या राजकीय सहभागाचा विचार करता, दलित-बहुजन वर्गाकडे सत्तेतील प्रमुख दावेदार म्हणून पाहिलं गेलं आहे. पण याची दुसरी बाजूही आहे. ती म्हणजे निवडणुकीच्या रणनितीमुळं याचा भाजपलाच जास्त फायदा झाला असं म्हटल्या जाते पण इकडे महाराष्ट्रात दलित आणि ओबीसींसह सामाजिकदृष्ट्या उपेक्षित असणाऱ्या समूहाची मोठी लोकसंख्या आहे. तरीही त्यांचं राजकीय सत्तेतील प्रतिनिधित्व मात्र कायम काठावरचंच राहिलंय त्यामुळे बहुजनांची चळवळ पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी वंचित ला सहकार्य कराव अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here