Home चंद्रपूर चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपा कांग्रेस की वंचित? काय आहे धक्कादायक अंतर्गत सर्व्हे.

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपा कांग्रेस की वंचित? काय आहे धक्कादायक अंतर्गत सर्व्हे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे आमदार प्रतिभा धानोरकर, व वंचितचे राजेश बेले यांचे तगडे आव्हान ?

चंद्रपूर :-

येणाऱ्या 2024 च्या चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा निवडणुकीत मतदार कुणाला कौल देतील हे सध्या गुलदस्त्यात आहे, पण भाजपा विरुद्ध कांग्रेस हा महामुकाबला रंगणार असल्याचे दिसत असतांना वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले यांनी अचानक एंट्री केल्याने यावेळी तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहे, दरम्यान येणाऱ्या निवडणूकित मीच निवडून येणार अशी प्रत्येक उमेदवारांना खात्री असतें व तसें तें राजकीय गणिते तयार करतात मग ती गणिते जातीच्या नावावर असेल तर कधी आर्थिक ताकतीवर, दरम्यान येणारी निवडणूक जातीच्या आधारावर होणार का? हा प्रश्न निर्माण केल्या जातं आहे, कारण काही उमेदवार आपली जातं समोर करून मतदारांना भावनिक आव्हान करतांना दिसत आहे, पण जे जातीच्या भरोशावर निवडणूक जिंकण्याचे स्वप्न बघत आहे त्यांनी त्यांच्या जातीच्या विकासासाठी काय दिवे लावले व जातीतल्या कुठल्या माणसांना मोठे केले याचा हिशोब जर मागितला तर स्वतःच्या जातीपेक्षा इतर जातीच्या लोकांनाचं त्यांनी मोठे केल्याचा इतिहास दिसत आहे, तर मग जातीची लोकं फक्त निवडणुकीतचं वावरासाठी असतात का? असा सुद्धा प्रश्न निर्माण होतं आहे, त्यातच धानोरकर परिवाराची सर्वत्र सत्ता असतांना त्यांच्या माध्यमातून जातीचा उद्धार किती झाला यांचा हिशोब खुद्द धनुजे कुणबी समाजाचे कर्तेधर्ते पदाधिकारीचं योग्य पद्धतीने देतील असा युक्तिवाद धनुजे कुणबी समाजाच्या एका नेत्याने केला आहे.दरम्यान या निवडणुकीत कुणाचे पारडे जड होईल याचा अंतर्गत सर्व्हे लवकरच समोर येणार आहे. भाजप कांग्रेस व वंचित च्या उमेदवारांनी नामांकन फॉर्म भरते वेळी मोठे शक्तिप्रदर्शन केले मात्र अगोदरच उमेदवारी मिळाल्याने भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा शिस्तबध प्रचार आणि बळकट बूथ यामुळे तें सध्या तरी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

खरं तर जिथे कर्तृत्व संपलं तिथे जातं वापरली जाते असं म्हटल्या जाते, कारण ज्यांनी जनतेच्या आशीर्वादातून सत्ता हस्तगत केली, त्या सत्तेतून स्वतःच्या प्रापर्ट्या उभ्या केल्या, सगळीकडे आपल्या इमारती उभ्या केल्या, जमिनी घेतल्या बार घेतले, दारूच्या धंद्यात गुंतवनुका करून महिन्याकाठी कोट्यावधी रुपयाची आमदानी सुरु केली, मात्र त्यातून समाजाला व जनतेला काय मिळाले? खरं तर त्यातून कुण्या गरिबांना मदत नाही की समाजाच्या कल्याणसाठी कुठला उपक्रम नाही, केवळ आपलं सम्राज्य निर्माण करून आम्हीचं सर्वांश्रेष्ठ अशी जहांगिरी ज्यांनी तयार केली तें म्हणतात की आम्हच्या जातीची संख्या जास्त असल्याने मला तें निवडून देईल. पण जातीयवादी लोकांनी जेंव्हा जेंव्हा निवडणूक जिंकण्याचे कारस्थान रचले तेंव्हा तेंव्हा तें हरले हा इतिहास आहे हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं, ओबीसी समाजाचे नेते वं ज्यांना विधानसभेचा उत्कृष्ट संसदपटू हा सन्मान मिळाला आणि ज्यांचा ओबीसी वर्गात मान व सन्मान आहे, त्या वामनराव चटप यांना कुणबी समाजाचे 8 लाख मतदार असतांना सुद्धा निवडणूक जिंकता आली नाही, व 2009 व 2014 मध्ये वामनराव चटप यांना समाजाच्या लोकांनीचं पाडलं, खरं तर तें लोकसभा जातीच्या निकशानुसार निश्चितपणे जिंकले असतें, पण चंद्रपूर जिल्ह्यातील जनता ही जातीच्या विळख्यात अडकत नाही हे वेळोवेळी सिद्ध झालं असतांना यावेळी कुठल्या आधारावर जातं फॅक्टर चालेल? याची शंका येत आहे. अर्थात यावेळी सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर व राजेश बेले यांच्यात मोठी टक्कर होऊन मोठे सामाजिक ध्रुवीकारण होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर लोकसभेचा काय आहे इतिहास?

मागील सन 2019 ची लोकसभा निवडणूक ही हंसराज अहिर विरोधात बाळू धानोरकर अशी थेट झाली होती, मात्र वंचित चे राजेंद्र महाडोळे यांनी १,१२, ०७१ एवढी मते घेऊन भाजप चा गेम केला होता, तर बाळू धानोरकर (काँग्रेस) यांना ५,५९, ५०७ मते मिळाली होती व हंसराज अहीर (भाजप) यांना ५,१४, ७४४ मते मिळाली, त्यात बाळू धानोरकर हे ४४,७६३ मतांनी विजयी झाले होते, मागील वेळी हंसराज अहिर यांच्या विरोधात चक्क भाजपाचे पदाधिकारी गेले होते व एकदा हंसराज अहिर यांना पाडायचेच असा प्रचार झाला आणि खुद्द भाजपा च्या बालेकिल्यात कांग्रेस च्या उमेदवाराने आघाडी घेतली होती, सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार हंसराज अहिर यांना तब्बल 5 लाख 8 हजार 49 मिळाली ती मते काँग्रेस उमेदवार संजय देवाlतळे (271780) व आम आदमी पक्षाचे उमेदवार वामनराव चटप (204413) यांच्या दोघाच्या मत्तापेक्षा जास्त होती. त्यामुळे या लोकसभा क्षेत्रात जातीला बघून कुणी मतदान करेल अशी शक्यता कमीच आहे.भाजप विरोधात जनमत असलं तरी प्रतिस्पर्धी उमेदवाराच योगदान काय हे पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे या निवडणुकीत वरकरणी कांग्रेस उमेदवार यांना पाठिंबा असल्याचे दिसत असले तरी कांग्रेस अंतर्गत आपसातील वैर आणि आत्ताच एवढी मुजोरी तर नन्तर काय होईल अशी पक्षांतर्गत विरोधकांमध्ये असलेली भीती यामुळे कांग्रेस ला आपला गड राखण्यास मोठी सर्कस करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here