Home चंद्रपूर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ओबीसी नेते राजेश बेले यांच्या उमेदवारीने समीकरण बिघडले

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ओबीसी नेते राजेश बेले यांच्या उमेदवारीने समीकरण बिघडले

हजारो समर्थक व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी मिरवणूक काढून भरला नामांकन फॉर्म. वंचित चा कुणाला फायदा कुणाला तोटा.

चंद्रपूर :-

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांनी दिनांक 27 मार्च रोजी आपला नामांकन अर्ज दाखल करतांना मोठे शक्तिप्रदर्शन केले. जवळपास 5 हजार पेक्षा जास्त संख्येने कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित राहून राजेश बेले यांचे नामांकन फॉर्म भरताना मोठा जल्लोष केला.

राजेश बेले यांनी सकाळी साडेदहा वाजता संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन करून, माता महाकालीच्या चरणी नतमस्तक होऊन,पटेल हायस्कूल जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य अशा रॅलीच्या द्वारे गांधी चौकातून आंबेडकर चौक ते जटपुर गेट तें जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयात आपला नामांकन अर्ज दाखल केला. या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते, ओबीसी समाजाचे नेते, तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राज्यात वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी यांच्यातील चर्चित जागावाटप फार्मूला फसल्याचे चंद्रपुरातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांना एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. ओबीसी समाजातील तेली समाजाचे महत्त्वाचे नेते असलेल्या राजेश बेले यांनी आपल्या समर्थकांसह आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्चित केले होते. जनतेने मतरुपी आशीर्वाद देत वंचित बहुजन आघाडीचा रथ विजयाकडे न्यावा असे आवाहन बेले यांनी नामांकन फार्म भरताना उपस्थित प्रसारमाध्यमाना दिलेल्या प्रतिक्रियेतून दिले, दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आज उमेदवारांची अधिकृत घोषणा केल्याने मविआ सोबत जाण्याची चिन्हे मावळली आहेत. आता चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुकीत त्रिकोणी मुकाबला पाहायला मिळणार असून राजेश बेले हे दलित मतांचे किती विभाजन करताहेत यावर भाजप कांग्रेस उमेदवारांच्या विजयांचे गणित अवलंबून आहे..

Previous articleजनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची उत्कर्ष साठी निवड
Next articleचंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपा कांग्रेस की वंचित? काय आहे धक्कादायक अंतर्गत सर्व्हे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here