Home चंद्रपूर राजकीय कट्टा :- महाविकास आघाडीच्या सभांना शिवसेना ( उबाठा) पदाधिकारी व शिवसैनिक...

राजकीय कट्टा :- महाविकास आघाडीच्या सभांना शिवसेना ( उबाठा) पदाधिकारी व शिवसैनिक का नाही?

काय आहे शिवसैनिकांच्या नाराजीचे कारण? वरिष्ठाचे आदेश पाळणार का?

चंद्रपूर : –

राज्यात महाविकास आघाडीच्या घटपक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभा व बैठकांमध्ये असणे आवश्यक आहे व तशा सूचना सुद्धा वरिष्ठाकडून आहे पण तरीही स्थानिक पातळीवर त्या घटक पक्षातील पक्ष पदाधिकाऱ्यांना योग्य तो सन्मान मिळत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत व त्यामुळेच महाविकास आघाडी च्या घटक पक्षातील पदाधिकारी आघाडीच्या उमेदवारांच्या सभा व बैठकाना उपस्थित राहत नाही ही वस्तुस्थिती आहे. हीच परिस्थिती चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवाराविषयी वरोरा भद्रावती तालुक्यात सुरु असून इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी ठिकठिकाणी प्रचाराचा धूमधडाका लावला आहे. मात्र आमदार धानोरकर यांचे निर्वाचन क्षेत्र असलेल्या वरोरा – भद्रावती विधानसभेत घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकांना शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्यासह शिवसैनिकांनी पाठ फिरवली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात महाविकास आघाडीच्या वतीने प्रतिभा धानोरकर यांना मैदानात उतरविले आहे. याआधी त्याने पती दिवंगत खासदार बाळू धानोरकर याठिकाणी खासदार होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते वरोरा – भद्रावती विधानसभेतून शिवसेनेकडून निवडून आले होते. त्यानंतर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला मात्र त्यांच्यातली शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेले प्रेम ते कधी विसरले नाही. मात्र प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या प्रचार सभेतील बॅनरवर हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोच गायब असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेली शिवसेना (उबाठा) गटाला धानोरकर यांच्या प्रचार सभेत योग्य न्याय तसेच बाळासाहेबांना बॅनरवर स्थान न दिल्याने नाराज असल्याची सर्वत्र चर्चा होती. मात्र तो अंदाज आज खरा निघाला. वरोरा – भद्रावती विधानसभेत शिवसेनेची मोठी वोट बँक आहे. अश्यातच धानोरकर यांनी आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्यासह शिवसैनिकांनी अनुपस्थिती दाखवल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची वरोरा – भद्रावती विधानसभेत चर्चा सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आघाडीतील बिघाडी कायम राहील की काँग्रेसचा हात पकडत शिवसैनिक प्रचाराला कामाला लागतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here