Home Breaking News धक्का :- सिडिसिसी बैंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार सह किशोर टोंगे यांचा...

धक्का :- सिडिसिसी बैंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार सह किशोर टोंगे यांचा भाजपात प्रवेश.

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान विविध पक्षाच्या नेत्यांचाभाजपमध्ये होतं असललेल्या प्रवेशाने महाविकास आघाडी उमेदवाराला हादरे?

चंद्रपूर :-

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुकीत आता रंगत आली असतांना काही राजकीय नेते आपली भूमिका बदलावताना दिसत आहे, त्यातच भाजपा उमेदवार तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास ठेऊन चंद्रपूर वणी आर्णीतील अनेक राजकीय नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतांना दिसत आहे. स्वकीय असो वा विरोधक हे जर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कामानिमित्याने आले तर त्यांचे काम ते नक्की करतात, हा अनुभव कदाचित सर्वाना आला असावा व त्यांचा स्वभाव सर्वाना परिचित झाला असल्याने भाजप नेते नितीन गडकरी यांच्याप्रमाणे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुद्धा अनेक राजकीय पक्षाचे नेते पक्ष प्रवेश करत आहे, त्यात आता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार यांनी भाजप मध्ये पक्ष प्रवेश घेतल्याने भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची ताकत वाढली आहे, अगोदरच कांग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतल्याने राजकीय वातावरण तापले असतांना आता मनोहर पाऊणकार यांच्या भाजप प्रवेशाने भाजप मोठे धमाके करतांना दिसत आहे, दरम्यान वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात संभावित उमेदवार असलेले सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांनी आपल्या समर्थकासह काल भाजप मध्ये प्रवेश केला होता.


हेही वाचा

आश्चर्यजनक :- आमदार प्रतिभा धानोरकर यांची संपत्ती साडेचार वर्षात 40 पटीने वाढली.


येत्या 19 एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणूकीचे रनशिंग फुंकले गेल्याने कांग्रेस भाजप या राष्ट्रीय पक्षाच्या उमेवरांनी प्रचारात जोर पकडला आहे, अशातच भाजप पक्षात अनेक राजकीय पक्षाचे नेते प्रचारादरम्यान भाजपमध्ये प्रवेश करतांना दिसत आहे, त्यामुळे भाजपचे उमेदवार यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांचे पारडे जड समजले जातं आहे. कांग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार तसा जोमात आहे, पण कांग्रेस पक्षात नेत्यांचे आपसात असलेले मतभेद आणि रननितीत बदल करण्याचे आव्हान उभे असतांना कांग्रेस च्या अंतर्गत गोटात असलेले मतभेद यामुळे कांग्रेस मध्ये शांतता आहे, जर कांग्रेस संयुक्तपणे सामूहिक ताकत बनून लढली तर भाजपला ती धोबीपच्छाड देऊ शकते एवढी मतांची मोठी ताकत कांग्रेस कडे आहे, अशातच काही मतदारांचं म्हणणं आहे की कांग्रेस चा कोण उमेदवार आहे, तो लुच्छा आहे, लफंगा आहे किंव्हा भ्रष्टाचारी आहे, हे आम्ही पाहणार नाही तर मत मात्र आम्ही पंजालाच देईल, त्यामुळे दलित मुस्लिम मतांचा गठ्ठा कांग्रेस कडे असताना केवळ रनणितीचा अभाव आणि पक्षातील नेत्यांची नसलेली एकवाक्यता यामुळे कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर बँकफूट वर आल्या असल्याचे दिसत आहे.

 

कांग्रेस माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर जिल्हा माध्यवर्ती सहकारी बैंक चे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार, विजय बल्की, रमण डोहे व वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील दिग्गज सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर आता पुन्हा काही कांग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते भाजप मध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जातं असल्याने भाजप निवडणूकीच्या काळात इतर पक्षातील किती नेत्यांचा भाजप पक्षात प्रवेश घेऊन लोकसभा निवडणुकीत किती धमाके करणार व त्यातून आपली स्थिती मजबूत करणार हे पाहणे आश्चर्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here