Home चंद्रपूर राजकीय कट्टा :- सुधीर मुंगनटीवर लोकसभेत गेले तरच विधानसभेत संधी,

राजकीय कट्टा :- सुधीर मुंगनटीवर लोकसभेत गेले तरच विधानसभेत संधी,

बल्लारपूर विधानसभेत कांग्रेसच्या संभावित उमेदवारासमोर धर्मसंकट, तर भाजपचे संभावित उमेदवार प्रचारात भिडले.

चंद्रपूर :-

बल्लारापूर विधानसभा मतदार संघ म्हणजे भाजप चा बालेकिल्ला समजाlला जातो, इथे मागील पस्तीस वर्षांपासून भाजप उमेदवारानी गड अबाधित राखला आहे, त्यामुळे विद्यमान आमदार व भाजप चे दिग्गज नेते तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सारखा तगाडा उमेदवार आहे तोपर्यंत आपल्याला विधानसभेत निवडून जाणे शक्य नाही अशा प्रकाराची स्थिती असल्याने या क्षेत्रातील संभावित इच्छुक उमेदवार लोकसभेत सुधीर मुनगंट्टीवार हे निवडून जावे अशी सर्वांची अपेक्षा आहे, त्यामुळे त्यांना विजयी कारण्यासाठी त्यांच्या पक्षातील व विरोधी पुढे सरसावले असल्याचे चित्र दिसत आहे.

बल्हारपूर निर्वाचन क्षेत्र मागील जवळपास पस्तीस वर्षापासून भाजपाच्या ताब्यात आहे. अनेकदा या मतदार संघाने कॉंग्रेसला विजयाच्या दारात नेवून अखेरच्या क्षणी हुलकावणी दिली होती, आता मात्र सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेच्या रिंगणात असल्यांने, ते दिल्लीत गेले तरच, बल्हारपूरची आमदारकीची जागा रिक्त होवू शकते व इच्छुकांची स्वप्नपूर्ती होवू शकते, यामुळे भाजपाचे इच्छुक मुनगंटीवारांचा प्रचार जीव तोडून करतील मात्र कॉंग्रेसमधील इच्छुकांसमोर ‘धर्मसंकट’ उभे आहे. त्यांनी मुनगंटीवार यांचे विरोधात ‘मनातून’ प्रचार केला आणि ते लोकसभेत पराभूत झाले तर, बल्हारपुर विधानसभेत परत तेच उभे राहतील अशावेळी त्यांचे विरोधात निवडूण येणे कठीण असल्यांचे ते खाजगीत बोलत आहे. दरम्यान कॉंग्रेसच्या प्रचारात ‘उन्नीस—बीस’ केले तर, बल्हारपूरची गादी मिळविणे त्या तुलनेत सोपे असल्यांचेही ते बोलत आहे. त्यामुळे प्रचारात किती सहभागी व्हावे यावर नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

कोण आहे बल्लारपूर विधानसभेत इच्छुक उमेदवार.

कॉंग्रेसमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश मारकवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर, बल्हारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, राहूल पुगलीया, मागील निवडणूकीत कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राजू झोडे, अलिकडेच कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या डॉ. अभिलाषा गावतुरे अशी इच्छुकांची भलीमोठी यादी आहे. यातील राहूल पुगलीचा, विनोद अहिरकर, प्रकाश मारकवार, राजू झोडे यांनी यापूर्वीच्या निवडणूकीत आमदारकीसाठी नशिब अजमाविले होते. संतोष रावत यांनी यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचेकडे बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रातून उमेदवारीची जाहीर मागणी केली आहे. वंचितमध्ये राहून वेळेवर कॉंग्रेसची उमेदवारीवर दावा केल्यांने राजू झोडे यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती हा अनुभव लक्षात घेवून डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी आधीच कॉंग्रेसचा दुपट्टा गळ्यात टाकला आहे. या सर्वांना बल्हारपूरची आमदारची खुणावत आहे, मात्र विधानसभेच्या निवडणूकीत सुधीर मुनगंटीवार सारखा तगडा, अनुभवी उमेदवार पुन्हा रिंगणात राहील्यास, अडचण निर्माण होवू शकते याचीही या सर्व इच्छुकांना जाणीव आहे, त्यामुळेच मुनगंटीवार लोकसभेत गेले तरच, आमदारकीचे स्वप्न पूर्ण होवू शकते याचीही त्यांना खात्री आहे. अशावेळी धानोरकर यांचा प्रभावी आणि मनातून प्रचार करून, स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घ्यायचे काय? असा प्रश्न अनेक इच्छुकांपुढे असल्यांने ते कॉंग्रेसचा प्रचारात अजूनही मनातून उतरले नाही. मुनगंटीवार लोकसभेत निवडूण गेले तरच बल्हारपूरचे आमदारकीचा मार्ग सुकर होवू शकत असल्यांने कॉंग्रेसमधील इच्छुकांसमोर धर्मसंकट निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here