Home Breaking News इंडिया बुकमध्ये नोंद झालेल्या 19 महिण्याच्या सुरवीची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली...

इंडिया बुकमध्ये नोंद झालेल्या 19 महिण्याच्या सुरवीची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  वयाच्या अवघ्या 19 व्या महिन्यात विविध 98 वस्तु ओळखणा-या घुग्घुस येथील सुरवी समिंद्र साळवे हिचे इंडिया बुकमध्ये नोंद झाली आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस येथील तिच्या राहत्या जात तिची भेट घेत अभिनंदन केले आहे.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घूसचे नेते इमरान खान, प्रेम गंगाधरे, डॉ. गौतम, मयुर केवले, राजू नाथर, मंगेश भोयर, देविदास अमृतकर, आशिष वाघमारे, समींद्र साळवे, पुजा साळवे, अर्चना साळवे, उमा महल्ले, अंजु ठोंबरे, शशिकला वाघमारे, दिपा वाघमारे, स्मिता यदुवंशी, प्रिया गौरकार, आशा टोंगे, संध्या कन्नूर, अंनु सिंग, किरण मदनकर, स्नेहा जेऊरकर, लिखिता ठोंबरे, संजय महल्ले आदींची उपस्थिती होती.

घुग्घुस मधील राम नगर या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या अवघ्या एकोणीस महिन्यांच्या सुरवी या चिमुकलीने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर इतिहास घडवला आहे. फक्त १९ महिन्यांची सुरवी या वयात तब्बल ९८ वस्तू ओळखत असून तिच्या या तल्लख बुद्धीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ ने घेतली आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी सुरवीच्या घरी तिची भेट घेत अभिनंदन केले आहे. यावेळी सुरवीन चित्रातील अनेक वस्तू, पक्षी ओळखून दाखविले.

या लहान वयात आपल्या मुलीवर चांगले संस्कार करणारे आणि तिच्या ठायी असणारी बुद्धिमत्ता ओळखणारे पालकही कौतुकास पात्र आहेत. तिचे हे यश नक्कीच अभिमानास्पद असून या चिमुकलीने भविष्यात आपल्या चंद्रपूरचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य उज्ज्वल करावे, अशी आशा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. यावेळी स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here