Home चंद्रपूर लक्षवेधी :- लोकसभा निवडणुकीत गुणवत्तेला चालना देणारे राजकारण होताहेत का?

लक्षवेधी :- लोकसभा निवडणुकीत गुणवत्तेला चालना देणारे राजकारण होताहेत का?

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात काय आहे परिस्थिती, कोण देईल विकासाला गती?

लक्षवेधी :-

भारतीय विरोधी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी म्हटलं आहे की “सुशिक्षित लोकांनी राजकारणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, अन्यथा तुम्हांला मुर्खाचे गुलाम व्हावं लागेल.” आज तेच सुशिक्षित लोकं कमी शिकलेल्या व राजकीय प्रगल्भता नसलेल्या राजकारणी लोकांच्या मागे लागून जणू त्यांचे ते गुलाम बनले आहे की काय? असा प्रश्न निर्माण होतं आहे, कारण जिथे गुणवत्तेला चालना देणारे राजकारण व्हायला हवे तिथे घराणेशाहीला चालना देणारे राजकारण होतं आहे जे समाजाहिताला बाधक ठरत आहे, नव्हे येणाऱ्या समोरच्या नवीन पिढीला बर्बाद करणारे ठरत आहे, पण तसे असले तरी आपण जात, पात, धर्म आणि गटातटात आपल्याला ढकलून देतो, जणू आपली सदविवेक बुद्धी खुंटली आहे आणि आपण वेगळ्याचं नशेत आहो, जिथे आपलं व आपल्या समोरच्या पिढीचं भविष्य बर्बाद करायला आपण निघालो आहे, ही परिस्थिती केवळ चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात आहे अशी गोस्ट नाही तर संपूर्ण भारत देशात परिवारवाद व घराणेशाही यातच राजकारणाचं घोडं अडलंय आणि ते राजकारण सुशिक्षित बुद्धिमान राजकीय नेत्यांच्या मुळावर उठलंय असं म्हटलं तर वावगे ठरू नये.

आज स्वतःच्या हिंमतीवर व गुणवत्तेच्या भरोशावर राजकारण करून आपली ओळख निर्माण करणारे फार थोडे आहेत, त्यात कांग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा प्रमुख उल्लेख करणे आवश्यक आहे, कारण त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचे मतदार संघ बांधले आणि कधीही ते हरले नाही, जेंव्हा भाजप कडून लोकसभा निवडणूक लढाविण्यासाठी उमेदवार भेटायचे नाही तेंव्हा दादा देशकर नंतर सुधीर मुनगंट्टीवार हे कमी वयात लोकसभा निवडणूक लढले व हरले, पण त्यांनी माघार घेतली नाही तर सन 1995 मध्ये त्यांनी चंद्रपूर विधानसभा निवडणूक लढवली व जिंकली, तेव्हापासून ते मतदार संघ बदलले तरी कधी हरले नाही, तीच परिस्थिती विजय वडेट्टीवार यांची आहे, गडचिरोली सारख्या नक्षलवादी जिल्ह्यात शिवसेना पक्षाची बांधणी करून थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत आपल्या कामातून ओळख निर्माण करून 1995-96 मध्ये वनविभाग विकास महामंडळाचे ते अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी चिमूर या क्रांतिकारी विधानसभा क्षेत्रात ओळख नसताना अगदी कमी काळात शिवसेना पक्षाची बांधणी करून निवडून येण्याची किमया साधली, पण या नेत्यांनी कधी लढणे सोडले नाही की कधी पराजय बघितला नाही, पण आता सर्वाना रेडिमेट हवंय, दुसऱ्यांच्या भरोशावर आपलं राजकीय करिअर कसं बनवता येईल या गोष्टीत सगळ्या राजकारण्याचं लक्ष असतं, पक्षासाठी मेहनत करणारे, पक्षाच्या हितासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे कार्यकर्ते हे मागे आणि गुणवत्ता नसताना पैशानी गळेलठ्ठ लोकांना पक्षाची तिकिटं हा नवा पायंडा आता पडायला लागला आहे,


हेही वाचा 

खळबळजनक :- सामाजिक माध्यमावर एका व्हायरलं स्क्रिप्ट वरून धानोरकर परिवाराच्या रंजक पटकथा समोर.


चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कांग्रेस कडे अनेक दिग्गज आहेत ज्यांनी पक्षासाठी आपले जीवन अर्पण केले पण पक्ष सोडला नाही, मागील वेळी कांग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना कांग्रेस ने उमेदवारी दिली होती व त्यावर त्यांचा अधिकार पण होता, मात्र शिवसेनेतून कांग्रेस मध्ये ऐन वेळेवर आलेले बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आणि बिचाऱ्या कट्टर कांग्रेसी कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं त्याचं शल्य त्यांना नक्की असेल, पण बाळू धानोरकर हे निवडून आल्यानंतर त्यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रात कट्टर कांग्रेसी असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मिळू न देता स्वतःच्या पत्नीला उमेदवारी देऊन ती जागा निवडून पण आणली, अर्थात तेव्हापासून जिल्ह्यात घराणेशाहीला प्रारंभ झाला, देवतळे परिवार यात काही अंशी त्याचा भाग असला तरी त्यांनी कधी जोरजबरदस्ती केली नाही तर प्रसंगी एकमेकांविरोधात लढले ही वस्तुस्थिती आहे, पण यामध्ये वडेट्टीवार परिवाराची उमेदवारी करिता कांग्रेस कडे मागणी आली तेंव्हा धानोरकर समर्थकांनी आमदारांच्या सांगण्यावरून वडेट्टीवार यांच्या विरोधात गरळ ओकली आणि थेट आव्हान दिले, पण राजकीय प्रगल्भता आणि दुरादृष्टीचा वेध घेणारा नेता म्हणून विजय वडेट्टीवार यांना ओळखलं जातं, त्यांनी उमेदवारीचा त्याग करून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी बहाल केली हे सत्य कुणी लपवू शकत नाही कारण त्यांच्यात गुणवत्ता आहे, खरं तर वैयक्तिक स्वार्थ सिद्ध करण्यासाठी केलेले राजकारण हे नेहमीच घातक असतें, समाजहित हेच राजकारणाचे उद्दिष्ट असले पाहिजे ते मात्र कुठेही दिसत नाही, त्यामुळे ही बाब लोकशाहिला तडा देणारी ठरत आहे.


हे पण वाचा

 आश्चर्यजनक :- आमदार प्रतिभा धानोरकर यांची संपत्ती साडेचार वर्षात 40 पटीने वाढली.


आमदार, खासदार कशाला बनवायला हवे ?

एकमेकांपासून संरक्षण करण्याचे आश्वासन देऊन गरिबांकडून मते आणि धनाढ्याकडून प्रचार निधी मिळविण्याची सभ्य कला म्हणजे राजकारण, कदाचित हीच कला राजकारणी लोकांनी शिकली आणि त्यावर आपली राजकीय पोळी शेकण्याचा धंदा उघडला असे म्हणता येईल, कारण जो आमदार असतो, जो खासदार असतो त्यांच्यात प्रथम गुणवत्ता असणे आवश्यक आहे, नंतर तो समाजाहित जोपासण्याचा संकल्प केलेला दूरदृष्टीचा विचार करणारा असावा, पण आपल्याकडे जे आमदार खासदार आहेत त्यांना त्याबद्दल काहीही घेणेदेने नाही तर संधी मिळते म्हणून आमदार खासदार व्हायचं आहे, चिकार पैसं कामावयाचे आहे, एवढा हेकेखोरपणा त्यांचा आहे आणि म्हणून गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जान नसलेले असले आमदार खासदार हे जनतेच्या कसोटीवर खरे उतरू शकत नाही, त्यामुळे उमेदवार हा सुशिक्षित आहे का? त्याचे जनतेप्रती प्रेम व सौदार्य आहे का? त्याला विकासाची परिभाषा कळली आहे का? व तो त्याच्या कसोटीवर खरा उतरू शकतो का? याचे मूल्यांकन करूनच जनतेने मतदानाच्या रूपात दान द्यायला हवे अन्यथा “भाड मे जाये जनता अपना काम बनता.” याप्रमाणे स्वतःच्या प्रापर्ट्या वाढविणारी जमात तयार होईल आणि ती गोरगरिबांच्या मतांवर मोठे झाले त्यांचेच जीव घेतील त्यामुळेच उमेदवार हा अर्धाशिक्षित नसावा तर तो सुशिक्षित आणि जनतेच्या प्रश्नांची जाणीव असणारा असावा आणि त्याच्यात गुणवत्ता असावी व जनतेसाठी समर्पित असावा असा उमेदवार शोधून जनतेने हाच निर्णय घ्यावा हीच सुज्ञ नागरिक म्हणून सर्वांची आशा अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here