Home चंद्रपूर त्या अपघातात जखमी झालेल्या तरुण मुलाच्या उपचारासाठी धावून आले विजयभाऊ वडेट्टीवार अपघातात...

त्या अपघातात जखमी झालेल्या तरुण मुलाच्या उपचारासाठी धावून आले विजयभाऊ वडेट्टीवार अपघातात तरुण मुलाच्या मेंदूला जोरदार बसला होता मार

त्या अपघातात जखमी झालेल्या तरुण मुलाच्या उपचारासाठी धावून आले विजयभाऊ वडेट्टीवार

अपघातात तरुण मुलाच्या मेंदूला जोरदार बसला होता मार

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

सावली :- तालुक्यातील मौजा.पारडी येथे अपघातात मेंदूला जबर मार बसलेल्या तरुण रुग्णाच्या कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, उसेगावचे उपसरपंच मा.सुनील पाल यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की,मौजा.पारडी येथील गणेश ईश्वर नरुले वय २३ वर्षे हे कामानिमित्य दुचाकी घेऊन घराबाहेर पडले असता,त्यांचा अपघात झाला यात त्यांचा मेंदूला गंभीर दुखापत बसल्याने त्यांना ताडदीने पुढील उपचारासाठी दवाखान्यात भरती करण्यात आले, वडील श्री.ईश्वर नरुले हे भूमिहीन शेतमजूर आहेत मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, घरातील तरुण मुलावर अशी वेळ आल्याने कुटुंबावर आर्थिक संकटाची बाजू आली, त्यांना आपल्या मुलाचा पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.

आर्थिक मदत देताना बोथलीचे उपसरपंच मा.नरेश पाटील गड्डमवार, रुद्रापूर ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.खुशाल राऊत,ग्रामपंचायत सदस्या पारडी सौ.निता नरूले आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here