Home Breaking News मोदीजींच्या विकास गाडीला काँग्रेसचे पंक्चर चाक लावू नका ना.सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूरच्या...

मोदीजींच्या विकास गाडीला काँग्रेसचे पंक्चर चाक लावू नका ना.सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूरच्या जनतेला जाहीर आवाहन

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

पठाणपुरा, बाबूपेठ, बंगाली कॅम्‍प परिसरात जाहीर सभांना उदंड प्रतिसाद

चंद्रपूर  :-  दि. ११ एप्रिल २०२४ : देशाचे कर्तृत्ववान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारत देशाची प्रगती होत आहे. देश विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत असताना काँग्रेसचे पंक्चर चाक मोदींच्या विकास गाडीला लावू नका, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे पंक्चर झालेले चाक आता पाच वर्ष दुरुस्त होऊच शकत नाही, अशी जोरदार टीका करीत चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा , शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.

चंद्रपूर शहरातील पठाणपुरा बाबू पेठ आणि बंगाली कॅम्प येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ नुकतीच जाहीर सभा पार पडली. या सभेला ते मार्गदर्शन करताना बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव हा लोकसभा निवडणूक असतो हा उत्सव आता जवळ आलेला आहे. या उत्सवात मागील वर्षी केलेली चूक यावर्षी होऊ नये याची प्रत्येकांनी काळजी घेतली पाहिजे. मागील साडेचार वर्षात या चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा विकास खुंटला आहे,

त्यामुळे आता आपण सर्वांनी विकासासाठी मतदान करा असे आवाहन मी करतो. चंद्रपूरकरांनी जेव्हा जेव्हा मला विकास काम करण्याची संधी दिली तेव्हा तेव्हा मी तुमच्या सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलो आहे, हे तुम्हाला माझ्या मतदार संघात केलेल्या विकासकामांवरून दिसून येते. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील कुठलेही गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणात गरिबी आडवी येणार नाही. यासाठी ६०० कोटी रुपये खर्च करून आपण एसएनडीटी युनिव्हर्सिटीची निर्मिती करीत आहोत. त्यामध्ये ६२ नवीन कोर्सेस सुरू होतील त्याचा या क्षेत्रातील गरीब कुटुंबातील मुलींना त्याचा फायदा होईल याचा मला विश्वास आहे.

डॉक्टरकडे गेल्यावर आपण त्याची जात विचारत नाही. तो माझ्या जातीचा असेल तर उपचार घेईल अन्यथा उपचार घेणार असे आपण म्हणत नाही. गवंडी कामगार हा माझ्या जातीचा असेल तरच मी घर बांधणार अन्यथा घर बांधणार नाही असा आपण विचार करीत नाही. कटिंग दाढी करायची असेल तर माझ्या जातीच्याच दुकानात जाऊन कटिंग दाढी करेल, याचा विचार आपण करत नाही. मग आपण निवडणुक आल्यावरच जात का बघतो? असा प्रश्न ना. मुनगंटीवार यांनी विचारला.

निवडणुकांमध्ये जातीपातीच्या राजकारणाला बगल दिली पाहिजे. जे उमेदवार मतदार संघाचा विकास करू शकत नाही, ते जातीपातीवर मत मागतात. मी कधी राजकारणात जात बघितली नाही, मी केलेल्या विकास कामांवर आजपर्यंत निवडून आलो आहे. त्यामुळे आपण सुज्ञ मतदारांनी जात न बघता जो विकास कामे करतोय अशाच उमेदवाराला तुम्ही संधी दिली पाहिजे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.

यावेळी ना. मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांच्या यादीचा पाढा जाहीर सभेत वाचून दाखविला. जाहीर सभेपूर्वी लक्ष्मीनारायण देवस्थान तसेच श्री व्यंकटेश स्वामी समर्थ मंदिर येथे भेट देऊन त्यांनी सहपरिवार स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतला. यासोबतच सकाळी गांधी चौक पासून पदयात्रेला ना. मुनगंटीवार यांनी सुरूवात केली. गोलबाजार, टिळक मैदान, भाजी मार्केट, सराफा लाईन पदयात्रा ना. मुनगंटीवार यांनी काढली. यावेळी केळी विकणारे, शेवय्या विकणारे, फुल विक्रेते, किराणा दुकानदार व्‍यावसायिकांनी सुधीर मुनगंटीवार यांना आर्शीवाद दिला. यासोबतच चंद्रपूरातील व्‍यावसायिकांकडून ना. मुनगंटीवार यांचा सत्‍कार करण्‍यात आला. या पदयात्रेमध्‍ये चंद्रपूरकर मोठया संख्‍यने सुधीरभाऊ आप आगे बढो हम तुम्‍हारे साथ है हा नारा देत सहभागी झाले.

पठाणपुरा बाबूपेठ आणि बंगाली कॅम्प परिसरात झालेल्या जाहीर सभेला भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडू हजारे, राजू कक्कड, सुरज पेदूलवार, किरण बुटले, प्रज्‍वलंत कडू, रामपाल सिंह, सविता कांबळे, बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, अजय सरकार, दिनकर सोमलकर, नगरसेवक संगीता खांडेकर, विशाल निंबाळकर, चंद्रकला सोयाम, तुषार सोम, राजीव गोलीवार, भरत गुप्ता, प्रतिभा ठाकूर, रवी चहारे, रमेश भुते, राजेंद्र खांडेकर, धनंजय हुड, श्याम बोबडे, सुभाष आदमने, अजय सरकार, डॉ. दीपक भट्टाचार्य, राजश्री जुमडे, कल्‍पना बगुलकर, ज्‍योती गेडाम, प्रदिप किरमे, शाम कनकम, दीपक कामनवार, मनीषा चौधरी, कविता सोमनाथ जाधव, चंद्रकला जाधव, सविता कांबळे, तुषार सोम यांच्यासह मित्रपक्ष महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here