Home चंद्रपूर वंचित बहुजन आघाडीच्या राजेश बेले यांना खासदार बनवा, अँड प्रकाश आंबेडकर यांचे...

वंचित बहुजन आघाडीच्या राजेश बेले यांना खासदार बनवा, अँड प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन.

 बहुजनांचा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी उमेदवाराच्या मागे भक्कमपणे उभे राहिल्यास आपण नक्की जिंकू, अँड प्रकाश आंबेडकारांचा विश्वास.

वणी प्रतिनिधी :-

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ अँड प्रकाश आंबेडकर यांनी वणी येथे जाहीर सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीवर सडकून टिका केली व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे, दरम्यान कांग्रेस भाजप या दोन उमेदवारांच्या तुलनेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला बहुजन समाजातील दलित आदिवासी व ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने व अँड प्रकाश आंबेडकर यांची सभा वणी येथे सभा झाल्याने मतदारात मोठे फेरबद्दल होण्याची चिन्ह दिसत आहे, अँड प्रकाश आंबेडकर यांच्या आव्हानानंतर वंचित उमेदवार बेले यांना दलित आदिवासी समाजाचा पाठिंबा बघता तिसरी मोठी ताकत तयार होतं असल्याचे चित्र दिसत आहे.

चंद्रपूर -आर्णी – वणी लोकसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारासाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकर हे वणीत आले होते. ते सभेला संबोधित करताना अस म्हणाले की, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघात जे कांग्रेस भाजप उमेदवार लढत आहे त्यात वंचित चा उमेदवार महत्वाचा आहे जर बहुजनांची चळवळ मोठी करायची असेल तर आपल्याला मतदान करतांना चळवळीच्या उमेदवारांना करावे लागेल, दरम्यान आज अँड प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद आहे त्यात ते काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन सभे करिता वंचितचे प्रदेश कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम, विदर्भ प्रदेश महासचिव बालमुकुंद घिरड, विदर्भ संयोजक रमेश गजभिये, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, जिल्हाध्यक्ष डॉ. निरज वाघमारे, महासचिव मिलिंद पाटील, शिवदास कांबळे, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, मोहन भवरे, रवी भगत, धम्मवती वासनिक, पुष्पा शिरसाट, संघपाल कांबळे, गौतम दारुंडे, प्रतीक मुनेश्वर, राजेश तलवारे, वैशाली गायकवाड, शरदा मेश्राम, अर्चना कांबळे, अर्चना नगराळे, प्रणिता कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते. सभा यशस्वी करण्यासाठी किशोर मुन, राजू चापडे, विशाल कांबळे, सोनू दुर्गे, कपिल मेश्राम, ताई डोंगरे, नंदिनी ठमके, विनोद कोठार, मिलिंद नगराळे, कुंदन नगराळे, अंजू पासवान, अर्चना दुर्गे, सुनीता दुपारे, शंकर रामटेके, केतन रामटेके, विलास तेलतुंबडे, वसीम शेख, रोहित डोंगरे, दीपक राणा, आश्विन दुर्गे राजू गजरे, अक्षय दुपारे, शिवम खोब्रागडे यांचे सह युवा व महिला आघाडी तथा भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here