Home चंद्रपूर धक्कादायक :- कांग्रेस उमेदवार धानोरकर यांनी वडेट्टीवार यांनाच केले टार्गेट, समर्थक नाराज.

धक्कादायक :- कांग्रेस उमेदवार धानोरकर यांनी वडेट्टीवार यांनाच केले टार्गेट, समर्थक नाराज.

“अजाण” व “अज्ञानता” चा परिचय देत प्रतिभा धानोरकर यांचे भाष्य आले त्यांच्याच अंगलट.

चंद्रपूर :-

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीन निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे व आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे, त्यात उमेदवार यांना भावनेच्या भरात हेच कळत नाही की आपण नेमकं काय बोलतोय, दरम्यान कांग्रेस उमेदवार धानोरकर यांनी कोरोना काळातील उदाहरणं देतांना कांग्रेस पक्षाच्या तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावरच टिका केली असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरलं होतं आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार समर्थक नाराज झाले असल्याने आपल्या फायद्यासाठी वापरण्यात आलेले उदाहरणं कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या चांगलेच अंगलट आल्याचा प्रकार समोर आला आहे.

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कोरोना काळात काय केले याची माहिती वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जनतेला माहीतच आहे, त्यांच्याकडून केवळ शासकीय साहित्य वाटपाचा कार्यकम सोडला तर कोरोना संकट काळात सापडलेल्या रुग्णांना त्यांनी अशी कुठलीही ठोस मदत दिली नाही की रस्त्यावर उतरून जनतेच्या भावना समजून घेतल्या नाही, केवळ अवैध दारू व्यवसायातून पैसा कसा मिळावीता येईल याचीच त्यांना जास्त चिंता होती कारण कोरोना काळात त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या हे येथील लोकं समजून आहे परंतु कोरोना काळात आपल्याच पक्षाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार होते व त्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात ते दिसत नसल्याने लोकांनी “तुम्ही यांना पाहिलंत का.” अशा प्रकारचे बोर्ड लावले होते. त्यात लोकांचं म्हणणं होतं की वडेट्टीवार नागपूर च्या बंगल्यात राहून चंद्रपूर चा कारभार पाहतात व कोरोना संकट काळात जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. आता कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी जाहीर सभेत “अजाण” व “अज्ञानता” चा परिचय देत प्रतिस्पर्धी उमेदवार मुनगंटीवार यांच्यावर टिका करण्याचे सोडून वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधून काय साध्य केलं आहे हे विजय वडेट्टीवार यांच्या समर्थाकांना पचणी पडलं नाही.

धानोरकरांचं अगोदरच वडेट्टीवार यांच्यासोबत वैर?

कोरोना काळात विजय वडेट्टीवार जिल्ह्याचे पालकमंत्री होते, जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. खनिज विकास निधी मधील मदतीचे किट विजयवाडा ते “वार” एकटेच वाटप करीत आहे असा आरोप त्यावेळी बाळू धानोरकर यांनी केला होता.यावरूनच धानोरकर वडेट्टीवार यांच्यात वैरत्व निर्माण झालं होतं व जिल्हाधिकारी कुणाल खेमणार ची बदली झाली होती. वडेट्टीवार यांचाअधिकाधिक वेळ हा त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जात होता आणि म्हणूनच यांना आपण पाहिलंत का असे बोर्ड झळकले होते, दरम्यान नुकतेचं काही दिवसांपूर्वी कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या प्रचार सभेत या बाबींचा उल्लेख करीत “हे महाशय नागपूर च्या बंगल्यात होते…..! त्यांच्या हरवले आहे या आशयाच्या सोशल माध्यमांवर पोस्ट फिरल्या होत्या.” या आशयाचे संबोधन केले होते व त्या बोलण्याचा व्हिडीओ व्हायरलं झाला होता, त्यामुळे आमदार प्रतिभा धानोरकर यांची टिका ही वाडेट्टीवार यांच्यावर होती हे दिसत आहे, कारण कोविड काळात सुधीर मुनगंटीवार फक्त आमदार होते. या काळात त्यांनी आरोग्य विभागात लक्ष घालून कित्तेकांना मदत केली हे चंद्रपूरच्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे मतांचा जोगवा मागण्यासाठी खोट्या प्रचाराचा होत असलेला खेळ व विजय वडेट्टीवार सारख्या आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्याला होतं असलेला “ट्रोल” यामुळे विजय वडेट्टीवार समर्थक नाराज होतं असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here