Home चंद्रपूर महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा बिग्रेडच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, संजय निकोडे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सायली येरणे, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंडारे, कालीदास धामनगे, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, देवा कुंटा, करणसिंग बैस, कार्तिक बोरेवार, दूर्गा वैरागडे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, विमल कातकर, कल्पला शिंदे, अनिता झाडे, कविता निखाडे, आशु फुलझेले, स्मिता वैद्य, संगीता कुरजेकर, माधुरी बावणे, सतनामसिंग मिरधा, कैलास धायगुडे आदींची उपस्थिती होती.
महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती माळी समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधवांच्या वतीने शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. सदर शोभायात्राचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक येथे स्वागत मंच उभारण्यात आले होते. शोभायात्रा स्वागत मंचाजवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी क्रांतिसुर्य महात्मा ज्यो तिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रेत हजारोच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here