Home चंद्रपूर अशोक नेते हटाव गडचिरोली बचाओ,देश गुलामगिरीच्या वाटेवर…भाजपची तानाशाही रोका – विजय वडेट्टीवार...

अशोक नेते हटाव गडचिरोली बचाओ,देश गुलामगिरीच्या वाटेवर…भाजपची तानाशाही रोका – विजय वडेट्टीवार देशाच्या लोकशाहीचे कवच असलेले संविधानाला बदलविण्याचे भाजपचे षडयंत्र व अराजकता माजवून देश तोडण्याचे काम

अशोक नेते हटाव गडचिरोली बचाओ,देश गुलामगिरीच्या वाटेवर…भाजपची तानाशाही रोका – विजय वडेट्टीवार

देशाच्या लोकशाहीचे कवच असलेले संविधानाला बदलविण्याचे भाजपचे षडयंत्र व अराजकता माजवून देश तोडण्याचे काम

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

सावली: -सावली तालूका काँग्रेस कमिटीतर्फे इंडिया आघाडी प्रणित, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेस राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार हे मार्गदर्शन बोलतं होते, देशांतील महत्त्वपूर्ण प्रकल्प विकले गेले असुन दोन विकणारे व दोन घेणाऱ्यांनी देशाला उधवस्त करण्याचें कार्य चालविले आहे. देशांत प्रचंड महागाई, व बेरोजगारी यात जनता भरडली जात असताना देशावर वाढलेले कर्ज, देशाच्या अर्थव्यवस्थेचे झालेले वाटोळे यावरून जनतेचे लक्ष विचलित करीत धर्मांधता व जाती -जाती मध्ये विष पेरून भांडणे व दंगलीचे वातावरण तयार करण्यात येत आहे. या हुकुमशाही भाजप कडून आता देशाच्या लोकशाहीचे संरक्षण कवच असलेल्या पवित्र संविधानाला आता समूळ नष्ट करण्याच्या हेतूने षडयंत्र चालविले जात असून मतदारांनो तुम्ही गाफील राहिल्यास पुढील काळात आपण सर्व बहुजन बांधवांना गुलाम म्हणून जगावे लागेल.असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.*

आयोजित सभेस इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.संदीप पाटील गड्डमवार ,माजी जि.प.बांधकाम सभापती व जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.राम मेश्राम, महिला तालुका अध्यक्ष सौ.उषाताई भोयर सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,उपगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकर,माजि सभापती पंचायत समिती सावली मा.विजय कोरेवार,युवक शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार, शहर महिला अध्यक्ष सौ.भारती चौधरी जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी मा.प्रशांत राईचंवार,मा.दिलीप शेंडे,विवीध सेवा सो.अध्यक्ष मा.मोहन गाडेवार,युवा काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष मा.नितीन दुवावार,नगरसेवक मा.प्रितम गेडाम,मा.अंतबोध बोरकर,मा.नितेश रस्से,मा.प्रफुल वाळके,मा.गुणवंत सुरमवार,नगरसेविका सौ.साधना वाढई,सौ.सीमा संतोषवार,सौ.ज्योती गेडाम,सौ.ज्योती शिंदे,सौ.प्रियंका रामटेके,सौ.अंजली देवगडे,सौ.राधा ताटकोंडवार,माजी ग्रा.सदस्या सौ.कविता मुत्यालवार तसेच महाविकास आघडीचे व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.

पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या 10 वर्षा पूर्वी सत्तेत आल्यावर भाजपने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत प्रचंड दरवाढ करून अर्थिक शोषणातून जनतेला लुटण्याचे काम केले. देशांत महीला अत्याचार, गुन्हेगारी यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. व्यापारी हित जोपासणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगराखाली दाबून बड्या व्यापाऱ्यांना कर्ज माफी दिली. तर स्थानिक उद्योगांमध्येही भूमिपुत्रांची अवहेलना केली. देश बुडविनाऱ्यांनी आता अब की बार 400 पार नारा देऊन देशाचे संविधान बदलाविण्याचा घाट रचला आहे. मतदारांनो आता देश वाचविण्यासाठी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीच एकमेव पर्याय उरला असून इंडीया आघाडीच्या डॉ. नामदेव किरसान यांना विजयाचा आशीर्वाद देत प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

सलग 10 वर्षे खासदार म्हणुन संधी मिळूनही संसदेत मौन धारण करून क्षेत्रातील शेतकऱ्यांचे, नागरिकांचे, महिलांचे, युवा- युवतींचे प्रश्न सोडविण्यात सपेशल अपयशी ठरणाऱ्या निष्क्रिय खासदाराचा जनतेला काय उपयोग..? असा सवाल उपस्थित करीत इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनी भाजप उमेदवार अशोक नेते यांच्या वर निशाणा साधला.तर संविधानावर घाला घालुन मनुस्मृति विचारांचे हुकुमशाही सरकार चालवू पाहणाऱ्यांना व त्यांना साथ देणाऱ्यांना समाजाने बहिष्कृत करून महाविकास आघाडीलाच संविधान वाचविण्यासाठी अमूल्य मत द्या.असे आवाहन मा.संदीप पाटील गड्डमवार व मा.दिनेश पाटील चिटणुरवार यांनी केले.तर महागाईने गरिबांचे रक्त शोषणाऱ्या सरकारला पाय उतार करा.असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे यांनी केले. या प्रसंगी सावली तालुका व परिसरातील महाविकास आघाडीचे व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख, व हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here