Home चंद्रपूर खळबळजनक :- राजुरा येथे एका युवकाची गोळ्या घालून हत्त्या, आरोपी फरार.

खळबळजनक :- राजुरा येथे एका युवकाची गोळ्या घालून हत्त्या, आरोपी फरार.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे गजबजलेल्या चौकात घडलेल्या घटनेने राजुरा शहर हादरलं

राजुरा :-

जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आणि त्यातून गोळीबार प्रकरणाने जिह्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचे चित्र दिसत असतांना आता राजुरा शहरातील एका युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने राजुरा शहर हादरलं आहे, शिवज्योतसिंग देओल (वय 28) असे मृतक युवकांचे नाव असून वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी मृतकाच्या लहान भावाने याच राजुरा शहरात गोळीबार केला होता. त्यात एका निष्पाप महिलेचा बळी गेला होता. दरम्यान आजच्याच दिवशी त्याच्या मोठ्या भावाला भरचौकात गोळ्या घालण्यात आल्याने त्या घटनेचा या गोळीबाराशी संबंध आहे का हे पोलीस तपासात उघड होणार आहे.

शिवज्योतसिंग वडिलांना भेटून कर्नल चौकातून जात असताना दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून मारेकरी त्याचा पाठलाग करत होते. दुचाकीवरील व्यक्ती आपल्याला मारणार, याची चाहूल लागताच शिवज्योतसिंग एका दुकानात घुसला. मारेकऱ्यांनी दुकानात घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे राजुरा शहर हादरलं आहे. हा गोळीबार लोकांच्या समोरच झाल्याने चौकात मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी धाव घेत गर्दीला पांगवली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक सर्वच मार्गाने पाठवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here