Home चंद्रपूर चिचपल्लीतील नागरिकांचे हाल होऊ देणार नाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला...

चिचपल्लीतील नागरिकांचे हाल होऊ देणार नाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

अतिवृष्टीग्रस्तांना धान्य कीट,छत्री, ब्लँकेटचे वाटप

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर, दि.२३ – अतिवृष्टीमुळे चिचपल्ली येथील जवळपास ३०० घरांमध्ये पाणी शिरले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ताबडतोब भाजपा पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना धान्य कीट,छत्री, ब्लँकेट यांचे दि.२२ ( सोमवार) वाटप करण्यात आले. यावेळी दूरध्वनीवरून ना. मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधत मी पूर्ण शक्तीने आपल्या सोबत आहे, असा विश्वास दिला.*

दोन दिवसांपूर्वी चिचपल्ली येथील नागरिकांनी जवळपास ३०० घरात पाणी शिरल्याची माहिती ना. श्री. मुनगंटीवार यांना फोन करून दिली. ना. मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता पहाटेच फोन करून प्रशासनाला कामी लावले. मदतकार्य पोहोचविण्याचे आदेश दिले. पक्षातील पदाधिकाऱ्यांनाही घटनास्थळी जायला सांगितले. अतिवृष्टीग्रस्तांना धान्य कीट, छत्री, ब्लँकेट पोहोचविण्यात आले. चिचपल्ली येथील नागरिकांशी ना.मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. ‘मी पूर्ण शक्तीने तुमच्यासोबत आहे. काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही. गावाला शासकीय मदत मिळावी, यासाठी मी निर्देश दिले आहेत. आणि लवकरच मी तुमच्या भेटीला येणार आहे,’ असे ना.मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांना आश्वस्त केले.यावेळी भाजपचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे,सुभाष कासनगोट्टूवार,माजी जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, सरपंच पपीता कुंभरे,उपसरपंच चंदन उंचेकर,इमरान पठाण,प्रसिनजीत निमगडे यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे जवळपास ३०० घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील नागरिकांनी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून यासंदर्भात माहिती दिली होती. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता जिल्हाधिकाऱ्यांना मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश दिले होते. ‘चिचपल्ली गावाची प्रत्यक्ष पाहणी करा. तेथील नुकसानीचे पंचनामे करा. यासोबतच गावातील लोकांची तातडीने जिल्हा परिषद शाळेत राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करा,’ असे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी सोमवारी पुन्हा एकदा फोन करून गावकऱ्यांची विचारपूस केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here