Home चंद्रपूर आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी पूर्ण शक्तीने कार्य करण्यास कटिबद्ध पालकमंत्री ना. श्री. सुधीर...

आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी पूर्ण शक्तीने कार्य करण्यास कटिबद्ध पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मुल येथे आदिवासी समाजाच्या सभेत साधला संवाद

चंद्रपूर  :-  दि.२९ – आदिवासी समाजाच्या प्रगती आणि उत्थानासाठी तसेच आदिवासी गावांच्या विकासासाठी निवेदनाच्या माध्यमातून काही प्रश्न मांडण्यात आले आहेत. त्या सर्व प्रश्नांसाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जीव तोडून कार्य करण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुल येथे आदिवासी समाजाची सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, भाजपा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, मुलच्या माजी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण मडावी,आदिवासी आघाडीचे महानगरचे अध्यक्ष धनराज कोवे, चंदू मार्गोंनवार,नंदू रणदिवे,प्रभाकर भोयर,प्रवीण मोहुर्ले,संजय कोडापे,वर्षा परचाके, अशोक आलाम, भागवत कुमरे,गंगाधर मडावी, प्रमोद कोडापे, दत्तू कोरवते, अरुण सोयाम, अरविंद मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘काही गावे पेसा कायद्यांतर्गत समाविष्ठ व्हावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या महामहीम राज्यपाल महोदयांना सप्टेंबर महिन्यात आदिवासी संमेलनासाठी आमंत्रित करणार आहोत. त्यावेळी त्यांच्यापुढे हा विषय नक्कीच ठेवू,’ असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला. ‘आदिवासी समाज हा प्रामाणिक समूदाय आहे. इतरांची रेष न पुसता पराक्रमाने, मेहनत आणि कष्टाने स्वत:ची रेष मोठी करणारा हा समुदाय आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश शासन व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले. समाजात स्वातंत्र्याच्या संघर्षाची मशाल पेटविली. ‘भारत माता की जय’ची घोषणा करीत त्यांनी स्वातंत्र्याची लढाई सुरू केली,’ असे गौरवोद्गार ना. श्री. मुनगंटीवार यांनी काढले.

१५ नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांचा जयंतीदिन आता पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा होतो आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी समाजाचे योगदान अत्यंत मोठे आहे. मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर या समाजाच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. मात्र देशगौरव, पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी समाजाचा आत्मविश्वास वाढावा, मुख्य प्रवाहात आदिवासी समुदायाचे नेतृत्व वाढावे, या हेतूने राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी समुदायाला प्राधान्य दिले. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे एनडीएच्या उमेदवार असलेल्या श्रीमती द्रौपदी मुर्मू या देशातील आदिवासी समुदायातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या,’ याचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला.

गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी साम्राज्य राहिले आहे. त्याच हेतूने गडचिरोलीतील विद्यापीठाला गोंडवाना विद्यापीठ असे नाव दिले. मिशन शौर्यच्या माध्यमातून आपल्या आदिवासी समुदायातील तरुणांनी एव्हरेस्ट सर केले, असे ते म्हणाले. गुणवंतांचा सत्कार करताना त्यांनी आदिवासी समुदायातील शेकडो तरुण, तरुणी आपल्या देश आणि समाजाचा गौरव वाढविणार, असा विश्वास व्यक्त केला. वीर बाबुराव शेडमाके यांचे डाक तिकीट काढले जावे यासाठी प्रयत्न केले व त्यात यश आले. अर्थमंत्री असताना तेंदूपत्ता बोनस २० कोटीवरून ७२ कोटींवर नेला. आता शहरात राहणाऱ्या आदिवासी समुदायाला देखील शबरी योजनेचा लाभ घेता येणार आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

सुक्ष्म विकास आराखडा करणार

आदिवासी समुदायाच्या पदांवर इतरांची भरती करून आदिवासींवर अन्याय करण्यात आला होता. हा विषय स्वत: विधानसभेत उपस्थित करून त्यावर सरकारला चर्चा करायला लावली. त्यामुळेच आता आदिवासी समुदायाची स्वतंत्र भरती होत आहे. पण अजूनही आदिवासी समुदाय अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. भाजपा आदिवासी आघाडीतर्फे या गावांचा सुक्ष्म आराखडा करून सरकारद्वारे निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आदिवासी तरुणांना सक्षम केले

राजे खांडके बल्लारशाह यांच्या कार्यकर्तृत्वाची महती सर्वदूर पोहोचावी यासाठी बल्लारपूर येथील सभागृहाला त्यांचे नाव दिले. माडीया, कोरकू समुदाय अजूनही मागास आहे. या समुदायाच्या प्रगती, उत्थानासाठी राज्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक योजना आणल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

         काँग्रेसने वंचित ठेवले

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी ‘जय सेवा’ हा नारा दिला. हा केवळ नारा नसून आदिवासी समुदाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचा मंत्र आहे. ७० वर्ष सत्ता भोगूनही काँग्रेसजनांनी आदिवासी समुदायाला विकासापासून वंचीत ठेवले. आदिवासी समाज हा सात्विक, पराक्रमी आणि प्रामाणिक आहे. या समाजासोबत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण शक्तीने ताकदीने सोबत राहू, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी समाजाला दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here