Home चंद्रपूर संतापजनक :- सीएसटीपीएस मधील प्रती नियुक्तीच्या नावाखाली स्थापत्य विभागाचा घोटाळा उघड.

संतापजनक :- सीएसटीपीएस मधील प्रती नियुक्तीच्या नावाखाली स्थापत्य विभागाचा घोटाळा उघड.

ठराविक कंत्राटदारांसोबत मिळून कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारात प्रतिनियुक्ती झालेले अधिकारी सामील?

चंद्रपूर :-

चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन (cstps) मधील स्थापत्य विभागाचे अनेक कारनामे उघडकीस येत असून सन २००७ पासून कार्यरत असलेल्या प्राजक्ता स्वामी, अश्विनी नंदेश्वर, ॠषीकेश फुंडकर, स्वप्निल ठाकरे, महेश गौरी, बगडे,पेटकर यांना एकाच विभागात एकाच ठिकाणी प्रती नियुक्तीवर ठेवल्या जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती, दरम्यान अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्याचे विंनती अर्ज प्रशासनास्तरावर प्रलंबित असतांना जुन्या जागेवर मलिंदा मिळविण्याच्या हव्यासापोटी प्रतिनियुक्त्याचा खेळ खेळला जातं आहे. यात कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा करून घेण्यासाठी एकाच विभागात एकाच ठिकाणी कार्यरत ठेवले जात असल्याने कंपनीचे मुख्य अभियंता रडारवर आहे.

सीएसटीपीएस कंपनीत कंत्राटदारांकरवी अधिकारी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जातं असून आपल्या मर्जीतील व समुहातील कंत्राटदारांना कामे दिली जातात. मात्र इतर कंत्राटदारांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याचे बोलल्या जातं आहे. दरम्यान विशीष्ट कामे मर्जीतील कंत्राटदारांना देऊन थातूरमातूर कामे केली जात आहे.त्या कामासाठी या प्रतिनियुक्ती अधिकारी कर्मचाऱ्यांना एकाच विभागात ठेवण्यात येत आहे. ॲशबंड कडे जाणारे रस्ते, ॲशबंड कडे जाणारे रस्त्यावरील नदीवरील पूल, नालेसफाई, नाली खोलीकरण, नाली बांधकाम इत्यादी कामे या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून केली जातात. दरम्यान ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केली जातं आहे. आश्चर्यांची बाब म्हणजे याबाबत मुख्य अभियंता अनभिज्ञ आहेत.

स्थापत्य विभागात विशीष्ट विचाराच्या कर्मचारी अधिकारी यांचा भरणा अधिक्षक अभियंता यांनी करून ठेवला असल्याचे बोलल्या जातं असून कर्मचारी अधिकारी यांना काम करण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती आहे. याबाबत मुख्य अभियंता अनभिज्ञ कसे हा मोठा गंभीर प्रकार आहे. प्रतीनियुक्ती करण्यासाठी ज्यांचा हातभार लागला असेल त्या सर्वांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, यात नंदेश्वर यांच्या कामाची सुद्धा चौकशी करण्यात येऊन त्यांच्या चलअचल संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here