Home Breaking News चंद्रपूर: किशोर जोरगेवार यांच्या विजयाची शंभर टक्के खात्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे...

चंद्रपूर: किशोर जोरगेवार यांच्या विजयाची शंभर टक्के खात्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आशीर्वाद….

 

चंद्रपूर: किशोर जोरगेवार यांच्या विजयाची शंभर टक्के खात्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आशीर्वाद….

चंद्रपूर :-  आज घुग्घुस येथे केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरीजी यांच्या उपस्थितीत एक ऐतिहासिक क्षण गवसला, ज्यामध्ये गडकरी साहेबांनी चंद्रपूरच्या विकासाबद्दल आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे येथील सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे, आणि ते सांगतात की भविष्यात देखील त्यांचा संपूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत राहील.

News reporter :- अतुल दिघाडे

गडकरी साहेबांनी येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्याची खात्री व्यक्त केली आणि “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या तत्त्वावर आधारित सरकार स्थापनेसाठी आश्वासन दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे चंद्रपूर आणि आसपासच्या क्षेत्रात समतोल विकास साधला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन ऊर्जा आणि उत्साहाने प्रेरित झालेल्या किशोर जोरगेवार यांनी विकासाच्या प्रत्येक पातळीवर गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाने आपली भूमिका बळकट केली आहे, आणि आगामी काळात चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहणार असल्याचे सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here