किशोर जोरगेवारची स्थिती भाजपच्या शामकुळे सारखी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष.
चंद्रपूर :-
राज्याच्या राजकारणात सरड्याप्रमाणे आपले रंग बदलवून राजकीय फायदा मिळवून घेण्याऱ्या आमदारांची संख्या अनगीनत आहे, मात्र त्यात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांची बरोबरी कुण्याही राजकारणी आणि आमदारांना जमली नाही, नव्हे अगदी सरड्याला सुद्धा लाज वाटेल एवढा राजकीय रंग त्यांनी बदलला असून कदाचित त्याची नोंद गिनीज बुकात व्हायला पाहिजे असंच म्हणावं लागेल, दरम्यान भाजप पासून राजकीय करिअरला सुरुवात करणारे जोरगेवार यांनी उमेदवारी करिता शिवसेना, अपक्ष राष्ट्रवादी आणि नंतर पुन्हा भाजप अशी चक्कर मारून राजकीय गिरगिट म्हणून आपली स्वतःची छबी निर्माण केली आहे, त्यामुळे खुद्द भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी हेच जोरगेवार यांच्या दिमतीला नसल्याने मागील वेळेस भाजपच्या शामकुळे यांना भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पाडले तीच परिस्थिती आता किशोर जोरगेवार यांची होण्याचे संकेत मिळतं असल्याने भाजप बंडखोर यांना मोठे समर्थन मिळण्याची चिन्हे आहेत.
मागील निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेड नावाने सामाजिक संघटना तयार करून 200 वीज युनिट मोफत मिळेल यासाठी मला पाठबळ हवंय असं आवाहन करून जनतेला भुरळ पाडली होती, जनतेला वाटलं की जोरगेवार नक्कीच आम्हांला 200 वीज युनिट वीज मोफत मिळवून देईल आणि म्हणून अपक्ष असणाऱ्या जोरगेवार यांना जनतेने रेकॉर्डब्रेक 72 हजार पेक्षा जास्त मतांनी लीड देऊन निवडून आणले, पण कुठंलही राजकीय व्हिजन नसलेले व जनतेला दिलेल्या आश्वासनाला पायदळी तुडवून वीज बिलात प्रचंड वाढ झाल्यानंतर सुद्धा विधिमंडळ सभागृहात याबद्दल चिकार शब्द न काढता मौणीबाबा बनून राहिलेले किशोर जोरगेवार यांची लायकी आता जनतेने ओळखली असून त्यांचा आता शामकुळे होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.