मतदार संघात कुठंलाही शास्वत चेहरा नसल्याने मतदारांमध्ये वेगळीच कुजबुज? कोण होईल आमदार ?
राजकीय कट्टा :-
वरोरा भद्रावती विधानसभा निवडणुकीत यावेळी सगळे उमेदवार नवखे असले तरी त्यांचा राजकीय कारकीर्द इतिहास जवळपास शून्य असल्याने यावेळी कुणाला निवडून द्यायचे याबद्दल मतदारांमध्ये कुजबुज सुरु आहे, दरम्यान अपक्ष उमेदवार यांचा जोर सगळीकडे दिसत असल्याने प्रस्थापित राजकीय पक्षाच्या उमेदवारांपुढे मोठे आव्हान आहे, मात्र अपक्षांची हवा शेवटच्या दिवसापर्यंत टिकेल का? आणि मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची किमया ते साधनार का? याचे उत्तर महत्वाचे राहणार आहे मात्र शेवटी जनतेच्या मनातील आमदार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप कडून माजी मंत्री संजय देवतळे यांचे पुत्र करण देवतळे यांना उमेदवारी मिळाली खरी पण भाजप कडून अनेक इच्छु्कांची गर्दी होती मात्र त्यांना संधी मिळाली नसल्याने ते करण देवतळे यांना पाण्यात पाहत असल्याचे दिसत आहे, कुठंलाही राजकीय दांडगा अनुभव नसल्याने जनतेच्या जिव्हाळ्याचे विषय काय आहे? जनतेला नेमकं काय बरं वाटतंय याबद्दल अनुभव नसल्याने तेच ते मुद्दे त्यांच्याकडून समोर केले जात आहे, माजी मंत्री संजय देवतळे यांच्या काळात फार मोठा विकास झाल्याचे कुठे दिसत नाही त्यामुळे वडिलांचा वारसा तेवढा पुढे करून जनता मतदान करेल याची शक्यता वाटतं नाही, खरं तर भाजप महायुती सरकार विरोधात जनतेत अगोदरचं रोष आहे, शेतकऱ्यांच्या शेत पिकाला भाव नाही, महागाईचा तडका जनतेला श्वास घेऊ देत नाही केवळ लाडक्या बहिणीच्या नावावर मतदान महिला करेल असे वाटतं नाही, त्यामुळे एकूणच जातीय समीकरण बघून आपला विजय होईल अशी तूर्तास शक्यता नाही, कारण हा फॉर्मुला जसा मागील वेळी स्वर्गीय संजय देवतळे यांनी समोर करून भद्रावती तालुक्यात आपली प्रचाराची दोरी ढिली केली त्याचा जवळपास बारा हजाराचा फटका बसून त्यांनी जिंकलेली जागा हरली होती, त्यामुळे आता त्यांना अनेकांची मदत घ्यावी लागणार आहे.
कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांना आता लोकं काहीही म्हणतं असले तरी कांग्रेसची गठ्ठा मते व त्यांच्याकडे असलेली खासदारी व जिंकण्याचा राजकीय प्रदीर्घ अनुभव यामुळे प्रवीण काकडे आजही मुख्य लढतीत आहे, त्या पाठोपाठ शिवसेना बंडखोर मुकेश जीवतोडे, अहेतशाम अली, अनिल धानोरकर, डॉ चेतन खुंटेमाटे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, मात्र पक्षाची परंपरागत मते ते घेतील का यावर सगळे राजकीय गणित अवलंबून आहे.
भाजप कांग्रेस चे उमेदवार हे नवखे असल्याने यावेळी आपल्यालाच संधी मिळणार असा तर्क बांधून अपक्ष उमेदवारानी विजयाचे गणित लावले आहे, परंतु केवळ निवडणूकीच्या काळात जनतेसमोर गेल्याने जनतेत हवा होईल व त्यांचे मतं तयार होईल अशी शक्यता फार कमी आहे, जोपर्यंत प्रत्येक गावात बूथ निहाय कार्यकर्ते नाही व राजकीय वलंय असल्याचं चित्र मतदारापुढे दिसत नाही तोपर्यंत सगळे गणित हवेतच राहणार आहे, अपक्ष असलेल्या डॉ चेतन खुंटेमाटे यांच्याकडे सगळीकडून जमा झालेली फौज आहे पण जमिनी स्तरावरचे कार्यकर्ते नाही त्यामुळं केवळ चष्मे वाटल्याने जनतेची सहानुभूती मिळावीता येणार नाही, यामध्ये अपक्ष उमेदवार उकेश मुकेश जीवतोडे यांनी बऱ्यापैकी मजल मारली आहे, पण जोपर्यंत त्यांची गावस्तरापर्यंत मोर्चे बांधणी होत नाही ते मुख्य शर्यतीत येणार नाही कारण 340 बूथ ची बांधणी आणि त्यातही अपक्ष म्हणून लढत असलेली निवडणूक पाहिजे तशी सोपी नाही,
अहेतशाम अली यांनी सुद्धा तिसऱ्या आघाडीची हवा गावागावात निर्माण करून आपली उपस्थिती दाखवली, पण प्रहार पक्षांची संपलेली ताकत आणि त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची नसलेली प्रभावी संख्या यामुळे त्यांना मुख्य लढतीत येण्यासाठी मोठी खेळी करावी लागणार आहे, यामध्ये माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी वंचित ची उमेदवारी घेतल्याने ते निर्णायकं स्थितीत आहे, शिवाय भद्रावती शहरात ते मोठी आघाडी घेऊ शकतात, पण वरोरा तालुक्यात त्यांना गमिनी कावा करून आपलं प्रस्थ तयार करावं लागेल. भाजप बंडखोर राजू गायकवाड हे पूर्णतः माना समाजाचे मतांवर आपण निवडून येण्याचा दावा करत असले तरी त्यांचा समाज त्यांच्या पूर्णपणे पाठीशी राहिलं याची शक्यता फार कमी आहे, स्थानिक राजकारणं आणि राज्याचं राजकारणं यात फरक असल्याने त्यांची मजलं फार पुढे जाणारं नाही असे चित्र आहे.
या क्षेत्रातील सर्व उमेदवारानी आपल्या विजयाचे गणित त्यांच्या समर्थक आणि मार्गदर्शक मंडळीच्या भरोशावर मांडले असले तरी सगळे उमेदवार हवेतचं आहेत, कारण ज्यांच्याकड़े सगळी यंत्रणा आहे, त्या उमेदवा्राला शेवटच्या दिवशी विजयी होण्याची संधी आहे आणि जे केवळ हवा करतात त्याची हवा गेलेली असतें आणि म्हणून हवेत विजयाची अपेक्षा करणारे शेवटी अपयशाच्या गर्तेत जातात हा जुना राजकीय इतिहास बघता वरोरा भद्रावती विधानसभा निवडणूकीच्या या रणधुमाळीत विजयाचे कोण तोरण बांधेल हे येत्या चार पाच दिवसात समोर येणार आहे.