मंगेश बुरडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महोत्सवात समाज बांधवानी एकत्र येण्याचे आवाहन.
भद्रावती प्रतिनिधी.
आपल्या भारताचा पुरातन इतिहास बघितला तर भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका, पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. या नगरांच्या रचनेत, सौंदर्य, अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत. त्यांच्या वास्तुशास्त्राचे भारतात मोठे महत्व असून त्यांच्यापासूनच खरे घर बांधकाम करतांना व कुठलेही बांधकाम करतांना वास्तुशास्त्राचा वापर केला जातो असे प्रभू विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्य भारतात सर्वत्र उत्सव साजरा केला जातो, असाच एक मोठा उत्सव भद्रावती तेथे दिनांक 10 फेब्रुवारी रोज सोमवारला साजरा केला जात असून मंगेश बुरडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महोत्सवात समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समाज संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी भद्रावती येथे नुकतीच बैठक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली असून कुणाकडे काय जबाबदारी आहे याविषयी नियोजन करण्यात आलें यावेळी संघटनेचे अध्यक्ष मंगेश बुरडकर, उपाध्यक्षा सौ. तेजस्वी निवलकर, सचिव मंगेश अंड्रसकर, सहसचिव मनोज बुरडकर तर कोषाध्यक्ष दीपाली बोरीकर उपस्थित होते.