Home राष्ट्रीय पत्रकार आणि डॉक्टर्स यांना अडवू नका, जावडेकर यांनी दिले आदेश !

पत्रकार आणि डॉक्टर्स यांना अडवू नका, जावडेकर यांनी दिले आदेश !

माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेवून पोलिस प्रशासनाला दिले आदेश !    

कोरोना अपडेट :-

संपूर्ण विश्वात कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची लागण होऊन हजारो लोकांचे जीव गेले आहे आणि लाखों लोक यामुळे बाधित पण आहे, आपल्या देशात सुद्धा जवळपास ५०० च्या वर कोरोना पिडीत रुग्ण आहे अशातच त्यांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर्स जीवाचे रान करीत असतांना पत्रकार सुद्धा आपला जीव धोक्यात घालून व्रुत्त संकलन करण्यसाठी फिरत असतात त्यामुळे त्यांना पोलिस प्रशासनाने अडवू नये उलट त्यांना समजून घेऊन आपल्या व्यथा सांगाव्या असे आव्हान केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जा जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे,

आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

Previous articleधक्कादायक :-चंद्रपूर शहरातील मस्जिदीत लपून असलेल्या विदेशी नागरिकांना पोलिसांनी केली अटक!
Next articleपोलिस अधिकारी दिपक मैस्के आणि रायटर लालू यादव यांची गुंडागर्दी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here