Home चंद्रपूर सणसणीखेज :-डॉ. नगराळे विरोधातील त्या कारवाईत काय तथ्य ? त्यांच्या म्रुत रुग्णांचा...

सणसणीखेज :-डॉ. नगराळे विरोधातील त्या कारवाईत काय तथ्य ? त्यांच्या म्रुत रुग्णांचा कोरोना रिपोर्ट सरकारी प्रयोगशाळेत निगेटिव्ह !

खाजगी प्रयोगशाळेतील रिपोर्ट खरी कशी ? डॉ. नगराळें व रुग्णांच्या पाच सदस्यांचे नमुने ठरवतील आरोग्य प्रशासनाचे भविष्य, अफवांचा बाजार तेज ? मात्र म्रुत रुग्णांच्या परिवारातील सदस्यांना व परिसरातील नागरिकांमधे भीतीचे वातावरण!

चंद्रपूर प्रतिनिधी :-

सध्या चंद्रपूर मधे कुठलाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसून डॉ. नगराळे यांच्या रुग्णालयातील तो रुग्ण नागपूरच्या मेयो या शासकीय रुग्णालयात मरण पावला होता त्या घटनेला आता वेगळे वळण मिळाले असून नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयाने मुंबई येथे खाजगी प्रयोगशाळेत रुग्णांचे स्वैब नमुने पाठवले ते पॉझिटिव्ह असल्याचे बोलल्या जात आहे.नव्हे तशा प्रकारची रिपोर्ट ही प्रसारमाध्यमांकडे पोहचली असल्याची पण चर्चा आहे. मात्र या संदर्भात नागपूरच्या खाजगी डॉक्टरांनी कुठलीही अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना दिली नाही असे बोलल्या जात आहे. चंद्रपूर रहमतनगर मधील संशयित म्रुतक रुग्णांच्या परीसरात पोलिसांची मॉकड्रील झाली होती, मात्र ती मॉकड्रील नसून पोलिसांनी तो रहमतनगर शील  केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केल्या ज्याची  कुठेही पोलिसांनी अधिकृतपणे प्रसारमाध्यमांना माहिती दिली नव्हती. खरं तर जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी पोलिस प्रशासन कसं या संचारबंदीत काम करेल याची रंगीत तालीम पोलिस आवश्यक वार्डात करेल असे जाहीरपणे सांगितले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून रहमतनगर येथे ही रंगीत तालीम अर्थात मॉकड्रील केली होती. मात्र या पोलिसांच्या रंगीत तालीमला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी जोडल्या गेले आणि अफवांचा बाजार भरायला लागला, त्यामुळे चंद्रपूर येथील डॉ.नगराळे यांच्यावर जी पोलिस कारवाई करून त्यांना कॉरोनटाईन केलेले आहे. व त्यानंतर आता डॉ.नगराळे व म्रुत रुग्णांच्या नातेवाईकांचे नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासण्या करिता पाठवले आहे. ह्या सर्व घडामोडींचा वेध घेता केवळ तर्कावर कारवाई करण्यात येत आहे असे दिसत आहे.  कारण ज्याअर्थी नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय मेडिकल महाविद्यालयाची रिपोर्ट ही जर निगेटिव्ह आहे तर खाजगी डॉक्टरांच्या खाजगी प्रयोगशाळेतील ती रिपोर्ट जी प्रत्यक्षात डॉक्टरांनी जाहीर केली नाही त्यावर जिल्ह्यातील आरोग्य विभाग कसा काय विश्वास ठेवत आहे ? हे कळायला मार्ग नसून जर खरोखरच म्रुत रुग्णांची रिपोर्ट ही जर पॉझिटिव्ह असेल तरीही रुग्णांच्या म्रूतू नंतर ती खाजगी डॉक्टर कसा काय सार्वजनिक करू शकतो ? आणि जर त्या डॉक्टरांनी ही रिपोर्ट खरोखरच सार्वजनिक केली असेल तर त्यांचेवर गुन्हे दाखल व्हायला हवे. परंतु ज्या पद्धतीने जिल्हा आरोग्य प्रशासनाने स्वतःच्या प्रयोगशाळेतील रिपोर्टला अमान्य करून म्रुतकाच्या कुटुंबातील सदस्यांचे नमुने त्याचं नागपूरच्या शासकीय प्रयोगशाळेत पाठवले आहे. यावरून आरोग्य प्रशासन योग्य पद्धतीने हे प्रकरण हाताळण्यासाठी अपयशी ठरले असल्याचे दिसते. या प्रकरणात डॉ. नगराळे यांना ज्या पद्धतीने पोलिस कारवाई करून कॉरोनटाईन केले ते चुकीचे आहे हे स्वतः डॉ. नगराळे यांनी जाहीर विडिओतून जाहीरपणे सांगितले आहे.मात्र या सर्व भानगडीत म्रूतकाच्या कुटुंबीयांना मोठा त्रास होतं असून त्यांच्या राहत्या परिसरातील नागरिकांमधे सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here