Home चंद्रपूर धक्कादायक :- भोजराज मडावी यांचा नाव पलटून दुर्दैवी म्रुत्यु!

धक्कादायक :- भोजराज मडावी यांचा नाव पलटून दुर्दैवी म्रुत्यु!

घरचा कर्ताधर्ता गेल्याने कुटुंबावर पसरली शोककळा. पत्नी आई मुलींनी कसे जगावे? हा प्रश्न निर्माण झाला !

पोंभुर्णा ( प्रतिनिधी)-

एकीकडे कोरोना व्हायरसच्या संक्रमण भितीने देशात संचारबंदी लागली असून माणसाला घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे, मात्र ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच जगणं मुश्किल झालं आहे, अशातच घराचे बांधकाम अर्ध्यावर आहे ते गरीब बिचारे पैसा नसल्यामुळे कुठून तरी पैसे जमवण्याचे प्रयत्न करीत आहे.अशाच एका ४० वर्षीय मूल तालुक्यतील येरगाव येथील भोजराज पत्रुजी मडावी घराचे बांधकाम सुरू होते मात्र पैशाची जुळवाजुळव करण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील तो आपल्या बहिणीकडे गेला मात्र वैनगंगा नदी पार करत असताना त्याला आपला जीव गमवावा लागला. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून दिनांक ९ रोज गुरुवार ला सकाळी उघडकीस आली.

मूल तालुक्यातील येरगाव येथील भोजराज पत्रुजी मडावी वय ४२ वर्ष हा आपला मित्र प्रमोद भोयर राहणार येरगाव याला सोबत घेऊन दुचाकी वाहनाने जुनं गाव मार्गे बोरी-भिक्षी येथे गेले. बोरी गावाला जात असताना वैनगंगा नदी पार करून जावे लागते. या वैनगंगा नदीला पाणी असल्यामुळे त्यांनी नावे चा सहारा घेतला व बहिणीच्या घरी गेले. मात्र त्याच नावेवरून परत येत असताना नाव पलटी झाली व नावेवरील तीनही व्यक्ती पाण्यात बुडाले. दोघांनी कसेबसे आपले प्राण वाचविले मात्र भोजराज हा आपले प्राण वाचवण्यात यशस्वी ठरला. व त्याचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतक हा येरगाव येथे ग्रामपंचायत रोजगार सेवक म्हणून काम करत होता. त्याच्यामागे पत्नी, मुलगी व आई असा परिवार असून घरचा कमावता व्यक्ती गेल्यामुळे या तिरडीवर दुःखाचे डोंगर कोसळले असून जीवन जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here