Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- लोकमत समाचार चे प्रतिनिधी प्रणय कुमार बंडी यांच्यावर रेती...

ब्रेकिंग न्यूज :- लोकमत समाचार चे प्रतिनिधी प्रणय कुमार बंडी यांच्यावर रेती माफियांचा हमला ?

अवैध रेती तस्करानी मारपिट करून मोबाईल हिस्कावन्याचा केला प्रयत्न ! पत्रकारिता सुद्धा संकटात ?

घूग्गूस प्रतिनिधी ;-

सध्या लॉक डाऊन ची परिस्थिती असून या काळात कुठलाही गुन्हा हा गंभीर समजून आरोपीला मोठी शिक्षा ठोठावण्याचे प्रावधान आहे, मात्र कोयला तस्करी व रेती तस्करी करणारे मोठ्या प्रमाणात चोरटे सक्रिय झाले असून यावर करंडी नजर ठेवणारे पत्रकार ह्या अवैध धंदेवाल्यांच्या रडार वर आहे. मात्र काही पत्रकार सुद्धा अवैध धंदेवाईक यांना ब्लैकमेल करीत असल्याचे नुकतेच एक प्रकरण उघडकीस आल्याने पत्रकारिता सुद्धा आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली असल्याचे विदारक द्रुष्य दिसत आहे .
असाच एक प्रकार घूग्गूस परिसरात घडला असून
आज गुरुवारला जवळपास 2:00 वाजता घूग्गूस लोकमत समाचार चे प्रतिनिधी प्रणय कुमार बंडी हे एका कामा करिता जात असतांना त्यांना एक ट्रक्टर ने रेती खाली होताना दिसल्याने त्यांनी हे द्रुष्य आपल्या मोबाईल वरून चित्रित केले असता एका व्यक्तीने म्हणजेच रेती तस्करांनी त्यांचे सोबत बाचाबाची केली व त्यांना मारहाण करून मोबाइल हिसकावन्याचा प्रयत्न केला. या संदर्भात प्रतिनिधी प्रणय कुमार बंडी यांनी घूग्गूस पोलिस स्टेशन मधे रेती माफिया विरोधात तक्रार केली असल्याची माहीती आहे.

घूग्गूस पोलिस स्टेशन अंतर्गत ज्या पद्धतीने अवैध धंदेवाल्यांची दादागिरी सुरू असते तसे येथील पत्रकार सुद्धा अवैध धंदे वाल्यांच्या कक्षेतच आपली पत्रकारिता करीत असल्याने येथील प्रशासन व्यवस्था नेहमीच संभ्रमात असते, खरं तर पत्रकारिता क्षेत्रात चांगले सुजाण सुद्ण्य आणि कर्त्यव्यनिष्ठ व्यक्ती यांनाच वरिष्ठ जिल्हा प्रतिनिधी यांनी संधी द्यावी अशी मागणी होतं असतांना पत्रकारितेला काही संधीसाधू व पत्रकारितेच्या भरोशावर आपले पोट घेऊन फिरणाऱ्या पत्रकारांमुळेच पत्रकारिता संकटात असल्याने पत्रकारिता बदनाम होतं  असल्याची खंत आहे ….

Previous articleलॉक डाऊनचा गैरफायदा घेणाऱ्या रेती तस्करांच्या तहसीलदारांनी आवळल्या मुसक्या !
Next articleधक्कादायक : नकोडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार? की रचले छडयंत्र ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here