Home चंद्रपूर दखलपात्र :- दिलीप पल्लेवार यांनी केली कॅन्सर पडित पोचन्ना ऊर्फ सुनिल कलगुलवार...

दखलपात्र :- दिलीप पल्लेवार यांनी केली कॅन्सर पडित पोचन्ना ऊर्फ सुनिल कलगुलवार परिवाराला 5000 रूपयाची आर्थिक मदत्त !

लॉक डाऊन च्या काळात दिलीप पल्लेवार च्या रूपात देवदूत आल्याची पिडीत कुटुंबीयांची प्रतिक्रिया !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

एकीकडे कोरोनाच्या वैश्विक महामारी संकटात सर्व जनता घरी बसली असतांना जनतेच्या सेवेत अविरत कार्यरत असलेले काँग्रेस कमेटी चंद्रपूर जिल्हा पर्यावरण विभागाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप पल्लेवार यांनी गोरगरीब कुटुंबीयांना अन्नधान्य व भाजीपाला पुरवठा करून त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न सोडवला आणि आता पर्यावरण विभागातील कार्यकर्त्यांना सोबत घेवून कॅन्सर पीड़ित यांना पाच हजार रूपयाची आर्थिक मदत्त केली आणि कुठलीही गरज पडली तर आम्ही कलगुलवार कॅन्सर च्या बीमारिने झुंझ देत असलेल्या परिवाराच्या पाठीशी आहे असा ठाम निर्धार चंद्रपूर पर्यावरण विभाग जिल्हा अध्यक्ष दिलीप पल्लेवार यांनी व्यक्त केला. तसेच बहुजन सैनिक चैनल चे चंद्रपूर जिल्हा . प्रतिनिधि .विनोद दुर्गे यांनी जास्तीत जास्त मदत्त एक हाताने जे जमेल ते पैशाच्या रूपात कॅन्सर पीड़ित परिवाराला ,सामाजिक बांधिलकी म्हणून सहकार्य करा असे आव्हान केले या प्रसंगी अरविंद कुमरे , विनोद टेकाम, रहुख शेख, राहुल अर्रेपल्ली, प्रकाश चारपूवार शंकर मस्के ,शशिकपूर चव्हाण ,व त्यांचे सहकारी उपस्थित होते. डॉ. शंकर ठोकलवार ,होमोपैथीक क्लिनिक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने चंद्रपूर पर्यावरण विभाग अंतर्गत कार्याचे पालन व कोरोना वाइरस चा विरोध करून रोग प्रतिकार शक्तीवर्धक मोफत औषध देण्यात आले, महिला पर्यावरण विभागाचे कार्यकर्ता, सौ दीक्षा दुर्गे, विद्या धारला, बेबी कुमरे, रुकसाना शेख, उपस्थित होते. गरीब जरूरतमंद कॅन्सर पीड़ित पोचन्ना उर्फ सुनील कलगुलवार यांची पत्नी, ममता कलगुलवार व मुलगी पूजा यांनी आर्थिक मदत्त स्वीकारुन सर्वांचे आभार मानले.

Previous articleधक्कादायक :- चंद्रपूरातील  कोरोना रुग्णांची रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची साम टी व्ही मराठीची बातमी खोटी-जिल्हा शल्य चिकित्सक 
Next articleआनंदाची बातमी :- त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 44 पैकी 24 नमुने निगेटीव्ह.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here