Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूरातील  कोरोना रुग्णांची रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची साम टी व्ही मराठीची...

धक्कादायक :- चंद्रपूरातील  कोरोना रुग्णांची रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची साम टी व्ही मराठीची बातमी खोटी-जिल्हा शल्य चिकित्सक 

चंद्रपूरातील त्या कोरोना रुग्णाच्या पत्नी आणि मुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह त्यामुळे बाधित कोरोना  रुग्णाची रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह येण्याची शक्यता ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांकडून प्रकाशित करण्यात येत होत्या. एवढेच नव्हे तर शासनाच्या अधिकृत कोविड -19 या वेबसाईडवर चंद्रपूर जिल्ह्यात कधी दोन तर कधी तीन रुग्ण असल्याबाबत दाखविण्यात येत होते, आश्चर्याची बाब म्हणजे चंद्रपूर मधे आता नुकताच एक रुग्ण सापडल्याने महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वेब साईड वर चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात ४ रुग्ण दाखविण्यात येत आहे आणि केंद्रीय आरोग्य विभागाच्या कोविड 19 या वेब साईड वर दोन रुग्ण बरे झाले तर दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दाखविण्यात येत आहे . आणि इकडे जिल्हा प्रशासन म्हणताहेत की चंद्रपूर जिल्ह्यात आता केवळ एकच रुग्ण आहे. त्यामुळे या सर्व कोरोना संक्रमित रुग्णांच्या बाबतीत केंद्र , राज्य आणि स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्यात एकवाक्यता नाही. एवढेच नव्हे तर क्रुष्ण नगर मधील एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला त्याच्या प्रयोगशाळेतील रिपोर्ट मधे male एवैजी femal लिहिलेले आहे. याचा अर्थ चंद्रपूर मधील तो कोरोना बाधित रुग्ण खरोखरंच पॉझिटिव्ह आहे का ? हा प्रश्न अती महत्वाचा बनला आहे. अशातच साम टि,व्ही मराठी न्यूज चैनेल मधे तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अखेर निगेटिव्ह असल्याची बातमी आज दाखविण्यात आली आहे. मात्र या बातम्यांच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्ण नगर येथील पॉझिटिव रुग्णाच्या पत्नी आणि मुलीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्या मुलाचा अहवाल अद्याप प्रशासनाला प्राप्त व्हायचा आहे.आणि तो कोरोना बाधित रुग्ण निगेटिव्ह असल्याची साम टी व्ही मराठीची बातमी खोटी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आम्हच्या प्रतिनिधी ला दिली असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात नेमक चाललय तरी काय ? हा प्रश्न निर्माण होतं आहे. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ट्रव्हल हिस्टरी आणि त्यांच्या बाबतीत पुरेपूर माहीती समोर आल्यास हा कोरोना बाधित रुग्ण नैसर्गिक कोरोना बाधित आहे की संक्रमित कोरोना बाधित आहे याचा खुलासा होणार आहे, कारण ज्या रुग्णास दमा, अस्थमा,टी बी आणि निमोनिया चा आजार असतो त्याला कोरोना चे लक्षण पुरेपूर असते आणि कदाचित हा रुग्ण अशाच आजाराने ग्रस्त नैसर्गिकरीत्या आजारी असल्यामुळे त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल कारण जर तो कोरोना संक्रमितरित्या आजारी असता तर त्याच्या परिवारातील सर्वच सदस्यांना कोरोना झाला असता पण त्याच्या पत्नी आणि मुलीची रिपोर्ट ज्याअर्थी निगेटिव्ह आहे याचा अर्थ तो पण कोरोना संक्रमित नसावा अशी दाट शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here