Home कोरपणा खळबळजनक:- गडचांदूर पोलिस स्टेशन ठाणेदार भारती च्या भ्रष्ट लिला येताहेत समोर ?

खळबळजनक:- गडचांदूर पोलिस स्टेशन ठाणेदार भारती च्या भ्रष्ट लिला येताहेत समोर ?

पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड, मग ठाणेदार भारती च्या कारवाई चे काय ?

कोरपणा प्रतिनिधी :-

गडचांदूर पोलिस स्टेशन आता अवैध धंदेवाल्यांचे सरक्षण केंद्र बनले असून कुठल्याही गुन्हे प्रकरणात अंतिम शोध न करता त्या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण करून ते थंड बस्त्यात टाकण्याचे काम सद्ध्या जोरात सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे, महत्वाची बाब म्हणजे एखाद्या प्रकऱणा विषयी पत्रकारांनी स्टेशन डायरी संपर्क कक्षाला फोन केल्यास तेथील पोलिस कर्मचारी हे घटने संदर्भात माहीती देण्यास टाळाटाळ करीत असतात मात्र याबद्दल अधिक माहीती घेतली असता ठाणेदार भारती यांनीच पोलिस कर्मचाऱ्यांना मला विचारल्या शिवाय कुठलीही माहीती कुणाला द्यायची नाही असे आदेश दिले असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडित काही विशिष्ट लोकांना वाचविण्यासाठी ठाणेदार भारती यांचा पुढाकार असल्याची माहीती आता समोर येत असून या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी दिल्यानंतर सुद्धा या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कारवाई ची माहीती उशिरा दिली असल्याची सुद्धा माहीती आहे.

अगोदरच पैनगंगा कोळसा चोरी प्रकरण हे दिनांक ९ एप्रिलला समोर आल्यानंतर त्या प्रकरणाच्या मुळाशी न जाता वरवर तपासाचे इव्हेंट करणारी गडचांदूर पोलिस या प्रकरणाशी संबंधित दोन पत्रकारांना अजून पर्यंत साधी विचारपूस करू शकली नाही मात्र या प्रकरणाशी संबंधित काही व्यक्तींना आपल्या खाकीची भीती दाखवून त्यांच्याकडून काही मिळतंय काय ? याचा शोध मात्र त्यांनी नक्की घेतला असल्याची माहीती आता समोर येत आहे , केवळ हेच प्रकऱण नाही तर कैलास नगर वेकोली परिसरातील एका बियर बार मालकांनी खुल्या मार्केट मधे दारू विक्री साठी काही व्यक्तींना आपल्या दुकानातील इंग्लिश दारू बम्पर. बियर बॉक्स आणि इतर दारू दिल्यानंतर ही दारू जेव्हां कैलास नगर कडून पैनगंगा खदान विरूर गाडेगाव येथे दिनांक 6 एप्रिलला पकडल्या गेली तेव्हा गडचांदूर पोलिसांनी केवळ दोन आरोपीला पकडून व एक आरोपी फरार झाला असतांना ज्या बियर बार मधून दारू साठा आला त्या बार मालकाला सोडण्यासाठी मोठी रक्कम घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आता गडचांदूर शहरात पकडलेला जुगार सार्वजनिक न करता त्याला दडपण्याचा प्रयत्न ठाणेदार भारती करीत असल्याची चर्चा जोरात असल्याने ठाणेदार भारती यांच्या भ्रष्ट लीला प्रसारमाध्यमांच्या रडारवर आहे. मात्र असे असले तरी काही उच्चशिक्षित नागरिकांनी ठाणेदार भारती यांच्या विरोधात मुख्यमंत्री आणि ग्रूहमंत्री यांच्याकडे तक्रार केल्याने आता त्यांच्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून काय कारवाई होईल हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here