Home कोरपणा राजुरा विधानसभा मनसे वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष पदी राजू खटोड यांची नियुक्ती.

राजुरा विधानसभा मनसे वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष पदी राजू खटोड यांची नियुक्ती.

प्रदीर्घ काळानंतर मनसे सोबत असणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याचा सन्मान झाल्याची महाराष्ट्र सैनिकांची प्रतिक्रिया.

गडचांदूर :-

चंद्रपूर जिल्ह्याची औधोगिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या गडचांदूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी ताकत आहे, पण कार्यकर्त्यांना संघटित करणारा नेता या ठिकाणी नसल्याने वरिष्ठाकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे येथील पक्षाचे पदाधिकारी वागत आहे, परंतु त्या सुरेश कांबळे सारखे पदाधिकारी यांनी तालुका अध्यक्ष म्हणून मोठे कार्य सुरु केले आहे व स्थानिक बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन उभारून त्यांना न्याय मिळवून दिला आहे, दरम्यान मनसे तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांनी आपले सर्वोच्य योगदान दिले होते व काही काळासाठी ज्यांनी व्यवसायात लक्ष घातले होते ते राजू खटोड यांनी पुन्हा मनसेत सक्रिय होण्याची भूमिका घेतल्याने मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांनी राजू खटोड यांची राजुरा विधानसभा क्षेत्राच्या वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे, त्यांच्या नियुक्तीचे पत्र पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत काल गडचांदूर येथील विश्रामागृहात देण्यात आले, यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद गेडाम, जनाहित कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कालबंधे, सुनील गुढे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, कोरपणा तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे उपास्थित होते,

मनसे वाहतूक सेनेच्या राजुरा विधानसभा क्षेत्रात राजू खटोड यांची नियुक्ती झाल्याने या क्षेत्रात मनसेची ताकत वाढणार असून वाहतूक व्यवस्था व त्यामुळे होणारे प्रदूषण आणि जनतेला होतं असलेला त्रास यातून आपण योग्य तो मार्ग काढून पक्षाची मोठी ताकत उभारू अशी ग्वाही नवनियुक्त मनसे पदाधिकारी राजू खटोड यांनी आपल्या छोटेखानी मनोगत व्यक्त करताना दिली आहे, यावेळी कोरपना तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here