Home कोरपणा संतापजनक :- कोरपणा ठाणेदार एकाडेची पोलीस स्टेशनंमध्ये निरपराध व्यक्तीला बेदम मारहान.

संतापजनक :- कोरपणा ठाणेदार एकाडेची पोलीस स्टेशनंमध्ये निरपराध व्यक्तीला बेदम मारहान.

खाकी वर्दीतली गुंडगिरी आली समोर, आई बहिणी ला अश्लील भाषेत शिवीगाळ व डायलॉगबाजी करून 50 बाजीराव पट्ट्यानी त्या व्यक्तीची धुलाई.

ऑडिओ रेकॉरडींग वरून ठाणेदार एकाडे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुंडागिरीचा पर्दापास

कोरपणा :-

महाराष्ट्र पोलिसांचा संपूर्ण राज्यातील जनतेला गर्व आहे, पण या पोलिसांच्या वर्दीत काही भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीचे अधिकारी व कर्मचारी संपूर्ण पोलीस प्रशासनाची इज्जत वेशीला टांगत ”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ह्या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीदवाक्याला हडताळ फासत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत अशी शपथ घेऊन जर सर्वसामान्य लोकांवर केवळ आपल्या हप्ता वसुली करिता मारहान करत असेल तर मग आपण कायद्याच्या राज्यात राहतो का? असा प्रश्न निर्माण होतं आहे. कोरपणा पोलीस स्टेशनं अंतर्गत अशीच एक भयंकर घटना घडली असून खाकी वर्दीतली गुंडगिरी पुन्हा समोर आली आहे, दरम्यान संशयित आरोपी यांनी मोबाईल रेकॉर्डिंग सुरु करून पोलीस स्टेशनं मध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर जे घडलं ते सर्व रेकॉर्ड झालं असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे.

कोरपणा तालुक्यात काल अशाच एका घटनेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहे, काल विपुल देविदास मुनावत, वय २८ वर्षे धंदा- मजुरी रा तांडा नं. १ पो धानोली ता.कोरपना आला संशयित आरोपी म्हणून ठाणेदार एकोडे यांनी कोरपणा पोलीस स्टेशनं बोलावले, त्याअगोदर त्याच्या तांडा या गावी विपुल च्या काकाच्या घरी दारू पकडण्यासाठी ठाणेदार गेले असता काकाची एकटी मुलगी घरी होती त्यामुळे विपुलने म्हटले की काका घरी नाही त्यावरून ठाणेदार भडकले व तू सुद्धा दारू विकते तुझे घर दाखव म्हणून त्याच्या घराची झडती घेतली पण पोलिसांना काहीही मिळाले नाही व विपुल ला उद्या तू पोलीस स्टेशनं मध्ये ये मग बघतो असे धमकी दिली, दरम्यान
आरोपीच्या व त्याच्या नातेवाईकांच्या घरात कुठेही दारू मिळाली नसताना त्याला 50 वेळा बाजीराव पट्ट्याने बेदम मारहान करून जखमी केले, एवढेच नव्हे तर एका पोलीस अधिकाऱ्याला शोभनार नाही अशा अश्लील व अर्वांच्य भाषेत आरोपीच्या आई आणि बहिणीला शिवीगाळ करून मानवाधिकार कायाद्याला पायदळी तुडवलं, जिथे न्यायासाठी लोकं येतात तिथेच लोकांवर अन्याय केला जात असेल तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, दरम्यान विपुल एका खाजगी रुणालयात उपचार घेत आहे, त्याला बेदम मारहान झाल्याने बरोबर बोलता येत नसल्याची माहिती आहे या प्रकरणी विपुल चे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे तक्रार करणार करून ठाणेदार एकाडे व मेजर मंचक देवकते यांचेवर कार्यवाही करा व त्यांना निलंबित करा अशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी करणार आहे त्यामुळे आता ठाणेदार यांच्यावर काय कार्यवाही होते याकडे कोरपणा परिसरातील जनतेचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here