Home चंद्रपूर खेदजनक :- अनिल डोंगरे या कंत्राटदारांनी नुकसान केले 53 लाख आणि दंड...

खेदजनक :- अनिल डोंगरे या कंत्राटदारांनी नुकसान केले 53 लाख आणि दंड 95 हजार?

श्रीराम एंजरप्रायजेस या कंपनीचे कंत्राटदार डोंगरे व संबंधित अभियंता यांच्याकडून नुकसान भरपाई वसुल करण्याची मागणी 

चंद्रपूर :-

स्वतःला सामाजिक नेते व जनतेची सेवा करणारे कार्यकर्ते असल्याच्या अविर्भावात व जनतेसमोर आपली किती स्वच्छ प्रतिमा आहे हे बैनर होर्डिंगवर दाखविणारे भाजयुमो राज्य उपाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी त्यांच्या श्रीराम एंटरप्रायजेस कंपनीला वृक्ष लागवड व देखभाल करण्याचे कामात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने भ्रष्टाचार हीच समाजसेवा आहे का? हा प्रश्न उपस्थित होतं आहे, दरम्यान 53 लाखांच्या वृक्ष लागवडीच्या कामात एकही झाडं ते वाचवू शकले नसल्याने सीएसटीपीएस प्रशासनाने अनिल डोंगरे यांच्यावर झाडे जगवली नसल्याचा अहवाल तयार केल्यानंतर केवळ 95 हजार रुपयांचा दंड थोपटला ही बाब न समजणारी आहे कारण 53 लाखांच्या कामात केवळ 95 हजार रुपयांचा दंड कुठल्या आधारावर लावला याचा गुंता कायम असून या भ्रष्टाचारात स्थनिक चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे अभियंता हे सुद्धा यात दोषी असल्याने या कामावर देखरेख ठेवणाऱ्या अभियंता व अनिल डोंगरे यांच्याकडून 53 लाख रुपये वसुल करण्यात यावे व अनिल डोंगरे यांच्या कंत्राटी कंपनी श्रीराम एंटरप्रायजेस ला काळ्या यादीत टाकावे अशी पण मागणी होतं आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या माध्यमातून या परिसरात महाराष्ट्र शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड अभियाना अंतर्गत सन 2018-19 मध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, यांना देण्यात आलेल्या लक्षानुसार एकूण 40,000 वृक्ष लागवड कचराळा अॅश बंड भागात वन विभाग, चंद्रपूर यांनी पुरविलेल्या वृक्षांचे रोपन करण्यात आले. सदर वृक्ष लागवडीच्या देखभालाचे कंत्राट भाजयुमो चे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्या श्रीराम एंटरप्रायजेसला देण्यात आले होते. यामध्ये वृक्ष लागवड यासह देखभाल करण्याचे पण कंत्राट होते, मात्र सदर ठिकाणी लावलेली झाडे पूर्णतः मेली त्यामुळे झाडांची देखभाल व्यवस्थित न केल्या प्रकरणी सिएसटीपीसए व्यपस्थापनाने श्रीराम एंजरप्रायजेसला 95.436/- रुपयांचा दंड आकारला दरम्यान सीएसटीपीएस व्यवस्थापनावर राजकिय दबाव टाकुन बोगस कामाची बिले उचलणा-या कंत्राटदारावर व कामाची प्रत्यक्ष पाहणी न करता परस्पर बिले मंजूर करून शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल द्वारा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या त्यामुळे हे प्रकरण समोर आलं मात्र 53 लाखांच्या गैरव्यवहारात केवळ 95 हजार दंड लावणे म्हणजे सीएसटीपीएस व्यवस्थापनाची कुठेतरी अंतर्गत धागधुग सुरु आहे का? की अनिल डोंगरे यांना वाचविण्यासाठी हा खेळ सुरु आहे? हे प्रश्न आता उपस्थित होतं असून अनिल डोंगरे यांच्या श्रीराम एंटरप्रायजेस या कंत्राटी कंपनीला काळ्या यादीत टाकणार का? की पुन्हा या एजन्सीला कंत्राट देऊन भ्रष्टाचार सुरूच राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here