आज सगळे पक्ष विचारतात, पक्ष प्रवेश केल्यावर कुणी विचारणार नाही आणि बाहेरही पडता येणार नाही. धंगेकरांचा मोरेंना संयम ठेवण्याचा सल्ला.
न्यूज नेटवर्क :-
भाजपने पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेले दोन टर्म पुण्यात भाजपचे उमेदवार विजयी होत आहेत. आताही भाजपने मोहोळांच्या माध्यमातून विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा निर्धार केला आहे. मोहोळ यांच्या विरोधात अद्याप महाविकास आघाडीने उमेदवाराची घोषणा केली नाही. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यासाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचं नाव चर्चेत आहे. अशातच वसंत मोरेंनी मनसेला सोडचिट्ठी दिली आहे व पुणे चा मीच खासदार बनेल अशी आरोळी ठोकून महाविकास आघाडी च्या नेत्यांच्या भेटी घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहेत. दरम्यान लोकसभा निवडणूक लढण्याचे वेड लागलेले मोरे यांनी कांग्रेस चे सम्भावीत उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांची भेट घेऊन कांग्रेस मध्ये आपली खिचडी पकतेय का? याची चाचपणी केली, मात्र घंगेकर यांनी वसंत मोरे यांना कानपिचक्या देत कान टोचले आणि सल्ला दिला की कुठल्याही पक्षात जाण्याअगोदर शांत डोक्याने विचार कर, कारण एकदा का कुठल्या पक्षात गेला तर मग कोणी विचारणार नाही आणि मग तिथून बाहेर निघता पण येणार नाही असा सल्ला दिला, दरम्यान पक्षाचा जो आदेश असेल तो आपल्याला मान्य असेल पण मी मित्रासाठी उमेदवारी सोडणार नाही तर पक्षाने आदेश दिला तर माघार घेईल असे पत्रकारसमोर भाष्य करून त्यांनी वसंत मोरेची जणू विकेट पाडली.
वसंत मोरे हे सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. गुरुवारी मोरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर मोरे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे मविआ वसंत मोरे यांना उमेदवारी देणार का याबद्दल चर्चा सुरु झाल्या, पण जेंव्हा वसंत मोरे हे आमदार धंगेकर यांना भेटायला गेले त्यावेळी त्यांनी कांग्रेस च्या उमेदवारीवर आपला दावा सांगत वसंत मोरे यांना उपदेशाचे डोज पाजून बोळवन केली, त्यामुळे वसंत मोरे यांच्या मनसुब्यावर पाणी फेरलं गेलं आणि त्यांची गत “न घर का न घाट का” अशी झाल्याची दिसली.
मनसे अध्यक्ष राजसाहेब यांचं मत, मी कुण्या व्यक्तीच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष काढला नाही,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अनेक कार्यकर्ते हे नेते म्हणून उदयास आले आणि मग दुसऱ्या पक्षात जाऊन घरी बसले, त्यात पुणे च्या रुपालीताई ठोंबरे याचं ज्वलंत उदाहरणं आहे, खरं तर नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या वर्धापन दिनी राजसाहेब ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना सल्ला दिला होता की आपण पक्षाचं काम जोमात कराव, जनतेच्या समस्या जनतेचे प्रश्न सोडवावे व पण हे करतांना आपल्याला लगेच नगरसेवक आमदार व्हावं असं वाटेल पण हा विचार करतांना थोडा संयम पाळावा, पेशंन्स ज्यांनी ठेवलं ते मोठे झाले म्हणत त्यांनी भारतीय जनता पक्षाचं उदाहरणं दिलं की आज जो काही भारतीय जनता पक्षाचा डोलारा दिसतोय व सगळीकडे सत्ता दिसतेय ते कार्यकर्त्यांच्या अखंड केलेल्या संघर्षातून दिसत आहे, पण वसंत मोरे यांना जणू लोकसभेत खासदार बनण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षाच्या नाराजीच्या सुरातून मनसेला सोडचिट्ठी दिली खरी पण त्यांनी आपली विश्वासाहर्ता पण गमावली, मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी कुण्या व्यक्तीच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष काढला नाही, ज्यांना स्वतःच्या अहंमपणात जगायचं असेल तर ते पदावर राहणार नाही. खरं तर मनसे अध्यक्ष राजासाहेव ठाकरे यांचं हे परखड मत महाराष्ट्र सैनिकांनी समजून घ्यायला हवं नाहीतर वसंत मोरे सारखी गत होईल. “ना घरका ना घाट का.”