Home चंद्रपूर मनसे उपक्रम :-महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत MEL प्रभागातील कामगारांना...

मनसे उपक्रम :-महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत MEL प्रभागातील कामगारांना शीधासंच वाटप !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोरोना ची साथ संपूर्ण देशात पसरलेली आहे. व दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण वाढतच चालले आहे. त्याला आळा घालण्याकरीता देशांमध्ये लोकडॉउन घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांना उपासमारीची वेळ आलेली आहे. यासाठी सरकार, शासन जरी मदत करत असेल तरी शासनाची मदत पोहोचेपर्यंत कामगारांना उपासमार होत आहे. तसही असुन शासनाची योजना सर्वच कामगारांपर्यंत पोहोचेल याची शास्वती नाही. म्हणूनच मनसे नगरसेवक सचिन भोयर ,प्राध्यापक नितीन भोयर यांच्यातर्फे इंदिरानगर शाखा अध्यक्ष संजय फरदे ,राहुल लटारे,जितू चाचाने,राकेश पराडकर ,अनिकेत लाखे,रितेश ठावरी मंगेश चौधरी,अतूल ताजणे ,तुषार येरमे यांच्या हस्ते MEL प्रभागातगातील 100 कामगारांना शिधासंच वाटप करण्यात आले.5 kg तांदूळ,4 kg आटा,1 kg तूळीची डाळ,1 kg तेल पॉकेट,तिखट,मिठ आदीचा शिधासंच देण्यात आले तसेच कोरोना चा फैलाव रोखन्या करीता कामगारांना मास्क,डेटॉल साबणदेण्यात आले त्याचप्रमाणे विस्थापीत कामगारांना औषधी (pain killer),एनर्जी ड्रिंक,जेवनाची व्यवस्था,बिस्कुट पॉकेट वाटप करण्यात आले. त्यांची अश्याप्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन सयुक्तीकरित्या साजरा करण्यात आला. यावेळी प्रभगातील महाराष्ट्र सैनिक कैलाशजी पराडकार, ओंकार तोगटीवार,गणेश तोगटीवार,बंटी राऊत,चंदन राठोड,अंकित मीसाळ,साहिल राऊत,अभिशेक चौधरी,निखिल कोटकर,संदेश नकतोडे,शितिज करकाडे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थीत होते.

Previous articleनगरपंचायत कोरपना कडून दंडात्मक धडक कारवाई।
Next articleखळबळजनक:- गडचांदूर पोलिस स्टेशन ठाणेदार भारती च्या भ्रष्ट लिला येताहेत समोर ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here