Home चंद्रपूर धक्कादायक :- आपल्या परिवारासमोरच घेतली एका युवकाने फाशी ? वाचा सविस्तर.

धक्कादायक :- आपल्या परिवारासमोरच घेतली एका युवकाने फाशी ? वाचा सविस्तर.

दिनेश चहारे या वाघोबा चौक तूकूम येथील युवकाने गळफास घेवून संपवली आपली जीवनयात्रा !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

लॉक डाऊन च्या कळत घरात राहणाऱ्या लाखो लोकांची मानसिक स्थिती खराब झाली असून घरगुती तंटे तेवढेच वाढले आहे. त्यातच ज्या घरातील व्यक्ती दारूचा शौकीन असेल व त्याला दारू मिळत नसेल आणि जर एखाद्या वेळी दारू मिळालीच तर मग त्याचे संतुलन बिघडते अशीच एक दुःखद घटना चंद्रपूर तूकूम परिसरातील वाघोबा चौकातील चाहारे परिवारात घडली असून त्या परिवारातील दिनेश चहारे या ३६ वर्षीय युवकाने आई सोबत झालेल्या कडाक्याच्या भांडणामुळे संतापून जावून आज मध्यरात्री २ ते ४ च्या दरम्यान चक्क परिवारासमोरच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहीती दुर्गापूर पोलिस स्टेशन मधे देण्यात येवून आजच अंतिम संस्कार करण्यात आले आहे. या घटनेमुळे वार्डातिल लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात लहान दोन मुले असल्याची माहीती आहे.बातमी लिहिस्तोवर कुणावर ही गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते ..

Previous articleमहत्वाची बातमी :- चंद्रपूर जिल्ह्यातील सुशी दाबगावमधे सापडलेल्या वाघाच्या बछड्याची कोरोना चाचणी भोपाळमधे.
Next articleआनंदाची बातमी :-संचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वजिल्ह्यात  जाण्यासाठी मोफत एसटी .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here