Home चंद्रपूर महत्वाची बातमी :- चंद्रपूर जिल्ह्यातील सुशी दाबगावमधे सापडलेल्या वाघाच्या बछड्याची कोरोना चाचणी...

महत्वाची बातमी :- चंद्रपूर जिल्ह्यातील सुशी दाबगावमधे सापडलेल्या वाघाच्या बछड्याची कोरोना चाचणी भोपाळमधे.

नागपुरच्या प्रयोग शाळेने बछड्याची कोरोना टेस्ट करण्यास दिला नकार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूरच्या मूल तालुक्यात सुशी दाबगाव येथे 24 एप्रिल रोजी एक 4 महिन्यांचा बछडा शेतात सापडला होता. त्या बछड्याची कोरोना चाचणी करण्यासंदर्भात वन विभागाने प्रयत्न चालविला खरा पण नागपूर येथे त्याची अधिकृत कोरोना चाचणी होऊ शकत नाही कारण ICMR ने अधिकृत केलेल्या देशातील तीन प्रयोगशाळेतच बछड्याच्या स्वॅब तपासणी करावी लागणार आहे. या प्रयोगशाळा भोपाळ, बरेली आणि हरयाणातील हिसार इथं आहेत. यामुळे नागपूरच्या प्रयोगशाळेने या बछड्याची कोरोना टेस्ट करण्यास नकार दिला असून, स्वॅब चे नमुने परत नेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता चंद्रपूर वनविभाग हे नमुने आता जवळ असलेल्या भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. या अडचणीमुळे आता या बछड्याच्या चाचणीला आणखी उशीर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here