Home भद्रावती भद्रावती तालुक्यात वाघानी  चारगाव शेत शिवारात गाय केली ठार,

भद्रावती तालुक्यात वाघानी  चारगाव शेत शिवारात गाय केली ठार,

वेकोली कर्मचारी व गाव दहशतीत !

उमेश कांबळे – भद्रावती 

भद्रावती तालुक्यातील चारगांव खदान येथील शेतकाऱ्याची गाय दि.३ मे च्या रात्रि वाघाने ठार केली असून पीड़ित शेतकर्याचे ५० हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेने परिसरात दहशतीचे वातवरण पसरले आहे.तालुक्यातील चारगांव,देऊळवाडा, कुनाडा हा परिसर वेकोली ग्रस्त आहे.या परिसरातील चारगाव, तेलवासा,ढोरवासा,४१० जुना कुनाडा,नवीन कुनाडा या खदानि मागील २-३ वर्षांपूर्वी बंद पडल्या.या खदानीतील कामगारांना इतर खदानी मध्ये हलविण्यात आले आहे. या परिसरात केवळ मातीचे ढिगारे आणि आजूबाजूला झाडेझुडपे वाढल्याने निर्माण झालेले जंगल आढळून येते. तसेच वर्धा नदी आणि शिरना नाला ही पाण्याची साधने उपलब्ध असल्याने नेहमी या परिसरात पट्टेदार वाघ, बिबट,अस्वल, मोर, रानडुक्कर इत्यादी वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो .त्यामुळे परिसरातील नागरिंकामध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे .शिवाय माजरी येथील खदानिमध्ये कर्तव्यावर जाण्याकरिता या परिसरातील मार्गानेच कामगारांना जावे लागते.रात्रीच्या वेळी कर्तव्यावर जातांना हे कामगार चारचाकी वाहनाने जातात.५-६ महिन्यापूर्वी चारगाव जवळील नाल्यात एक पट्टेदार वाघ खडकात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. दि.३ मे च्या रात्री चारगांव येथील प्रदीप नाकाडे यांच्या मलकीची गाय नवीन कुनाडा ओपन कास्ट ते गुप्ता कोल वाशरीज या मार्गावर ठार केली.सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाच्या कर्मचार्यांनी घटना स्थळाचा पंचनामा करुन गायीचे शवविच्छेदन केले.त्या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात वनविभागातर्फे कॅमेरे लावण्यात आले आहे.घटनास्थळला वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर,क्षेत्र सहाय्यक एन.व्ही.हनवते,वरक्षक के. डी. कांबळे,खुशाल कंचनवार,राजू कुळमेथे यांनी भेट दिली.

Previous articleआनंदाची बातमी :- त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 44 पैकी 24 नमुने निगेटीव्ह.
Next articleमहत्वाची बातमी :- चंद्रपूर जिल्ह्यातील सुशी दाबगावमधे सापडलेल्या वाघाच्या बछड्याची कोरोना चाचणी भोपाळमधे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here